ओव्हनच्या आतले तापमान परिपूर्ण केकचा एक महत्वाचा घटक असतो. आपण ओव्हन चे तापमान जेंव्हा सेट करतो तेंव्हा एक समस्या असते. आपल्या ओव्हनवरील तापमान डिस्प्लेची अचूकता कमी असते. म्हणून वेगळा ओव्हन थर्मामीटर विकत घेणं गरजेचे आहे. असा ओव्हन थर्मामिटर ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट अशा ऑनलाईन वेबसाइट्स वर स्वस्तात उपलब्ध होतो.
ओव्हन थर्मामीटर डायलवरील तापमान आतल्या तापमानाशी जुळते याची दुहेरी-तपासणी करण्यासाठी आपण ते ओव्हनमध्ये सोडू शकता किंवा ओव्हनचे तापमान तपासण्यासाठी आणि कॅलिब्रेट करण्यासाठी प्रत्येक वेळी ते वापरु शकता.
ओव्हनचा दरवाजा उघडल्यामुळे आतील उष्णता बाहेर जाऊन ओव्हन थंड होते. शक्य असल्यास ग्लासमधून तापमान वाचावे.
धन्यवाद
– हर्षाली