ब्रेड बनवा गव्हाच्या पिठाचा घरच्या घरी कुकर मध्ये, तो ही यीस्ट शिवाय !

साहित्य

 • २ कप गव्हाचे पीठ
 • पाऊण कप दूध
 • १ टीस्पून व्हिनेगर किंवा लिंबाचा रस
 • १ टीस्पून बेकिंग पावडर
 • पाव टीस्पून बेकिंग सोडा
 • अर्धा टीस्पून मीठ
 • १ टीस्पून पिठी साखर
 • अर्धा कप दही
 • २ टेबलस्पून तेल
 • २ टेबलस्पून बटर

कृती

 • दुधात व्हिनेगर घालून मिक्स करा आणि १५ ते २० मिनटं ठेवून द्या
 • गव्हाचे पीठ घेऊन त्यात बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ घालून छान मिक्स करून घ्या आणि चाळणीने गाळून घ्या
 • नंतर साखर घालून मिक्स करून घ्या
 • वरील मिश्रणात दही आणि तेल घालून हाताने मिक्स करून घ्या
 • व्हिनेगर घातलेले दूध हळूहळू घालून वरील मिश्रण भिजवून घ्या आणि वरचेवर भुसभूशीत मळा. घट्ट मळू नका
 • लागेल तेवढेच दूध वापरा. कणिक थोडे पातळ मळा
 • झाकण ठेवून १५-२० मिनटं ठेवून द्या
 • कुकर मध्ये स्टॅन्ड ठेवा आणि झाकणाची शिटी व रिंग काढून झाकण लावा
   
 • १० मिनिटं गॅसवर कुकर प्रीहीट करण्यासाठी ठेवा
 • अलुमिनियमचे भांडे घेऊन तेलाने आतून ग्रीस करा मळलेले
 • आता झाकून ठेवलेले कणिक घेऊन पुन्हा तेलाच्या हाताने थोडे वरचेवर मळून घ्या आणि दोन्ही हाताने ओढून थोडे लूज करून घ्या म्हणजे ब्रेड छान जाळीदार बनतो
 • वरील कणिक भांड्यात घालून हलक्या हाताने पसरवून घ्या
 • वरून तेलाचा ब्रश फिरवा
 • नंतर वरील भांडे प्रीहीट झालेल्या कुकर मध्ये ठेवा व झाकण लावा (शिटी व रिंग नको)
 • मंद आचेवर ३५-४० मिनटं बेक करा
 • अर्ध्या वेळेनंतर झाकण उघडून ब्रेड बेक झालाय का नाही ते बघा. वरील थर कोरडा झाल्यास बटर वितळवून ब्रश फिरवा व झाकण लावून पुन्हा बेक करायला ठेवा
 • बेक झाल्यावर बाहेर काढा आणि वरून पुन्हा एकदा बटर वितळवून ब्रश फिरवा ओल्या फडक्याने ८-१० तास भांडे झाकून ठेवा
 • आता  ब्रेड भांड्याच्या बाहेर काढा
 • चाकूने स्लाईस कापून घ्या आणि सर्व करा

अशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Reply