व्हेज पिझ्झा बनवा चीझ, मायों, यीस्ट आणि ओव्हन शिवाय !

साहित्य

रेड सॉस साहित्य
  • २ छोटे आल्याचे तुकडे
  • ४-५ लसूण
  • १ लहान कांद्याचे काप
  • १ लहान टोमॅटोचे काप
  • अर्धा कप पाणी
  • २ टीस्पून तेल
  • १ टीस्पून लाल मिरची पावडर
  • पाव चमचा ओरिगॅनो (ऐच्छिक)
  • १ टीस्पून साखर
  • चवीनुसार मीठ
व्हाईट सॉस साहित्य
  • १ टेबलस्पून बटर
  • १ टेबलस्पून मैदा
  • अर्धा कप दूध
  • १ टीस्पून पाणी
  • चवीनुसार मीठ
पिझ्झा साहित्य
  • अर्धा कप पेक्षा थोडा जास्त मैदा
  • चवीनुसार मीठ
  • अर्धा टीस्पून पिठी साखर
  • पाव कप बेकिंग पावडर
  • पाव कप बेकिंग सोडा
  • १ टीस्पून वितळलेले तूप
  • ३ टेबलस्पून दही
  • १ टेबलस्पून पाणी
  • बेकिंग साठी कढईत ठेवण्यासाठी अर्धा कप मीठ
  • स्वीटकॉर्न सजावटीसाठी
  • कांद्याचे काप सजावटीसाठी
  • ढोबळी मिरचीचे काप सजावटीसाठी
  • टोमॅटोचे काप सजावटीसाठी
  • लाल मिरची पावडर 

कृती

रेड सॉस कृती
  • एक पॅन गॅसवर ठेवून त्यात आले, लसूण, कांदा, टोमॅटो, पाणी घालून पॅनचे झाकण बंद करा
  • मंद आचेवर ५ ते ७ मिनटं शिजवा
  • गॅस बंद करून मिश्रण थंड करा
  • आता मिश्रण मिक्सर मध्ये ग्राइन्ड करा
  • आता एक पॅन गॅसवर ठेवून त्यात तेल घाला आणि वरती बनवलेली पेस्ट थोडी घाला
  • वरून लाल मिरची पावडर, ओरिगॅनोघालून मिक्स करा
  • आता उरलेली पेस्ट घालून थोडे पाणी, साखर, मीठ घाला
  • झाकण लावा आणि कडेने तेल येईपर्यंत शिजवा
  • तुमचे रेड सॉस तयार आहे
व्हाईट सॉस कृती
  • एक पॅन गॅसवर ठेवून त्यात बटर घालून वितळवून घ्या
  • आता यात मैदा घालून मिक्स करा आणि मंद आचेवर ३ ते ४ मिनिट शिजवा सतत ढवळत रहा
  • आता दूध घाला आणि थोडं घट्ट होईपर्यंत शिजवा
  • गरज भासल्यास चमचाभर पाणी घाला
  • चिमूटभर मीठ घाला
  • तुमचे व्हाईट सॉस तयार आहे
पिझ्झा कृती
  • मैदा, मीठ, साखर, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा एकत्र करून मिसळून घ्या
  • वरील मिश्रणात तूप, दही, पाणी घालून छान मिक्स करून कणिक तयार करा
  • थोडी पातळसर कणिक तयार होईल. वाटल्यास थोडे पाणी अजून घाला
  • आता १० मिनटं कणिक छान मळा. छान स्मूथ गोळा तयार करा
  • आता कणिक बाउल मध्ये ठेवून वरून ओल्या फडक्याने १ तास झाकून ठेवा
  • एक कढई घेऊन त्यात मीठ घाला, वर स्टॅन्ड ठेवा आणि झाकण लावून मध्यम आचेवर १० मिनिटं गरम करा
  • प्लेट घेऊन तिला तेलाने ग्रीस करा
  • आता कणिक घ्या आणि पुन्हा मळून घ्या
  • या कणकेची पोळी लाटा. खूप जाड लाटू नका कारण शिजल्यावर पिझ्झा अजून फुगतो
  • आता हि पोळी प्लेट मध्ये ठेवा
  • कडेने तेल लावा
  • रेड सॉस पसरावा
  • वरून व्हाईट सॉस पसरावा
  • वरून स्वीटकॉर्न, कांद्याचे काप, ढोबळी मिरचीचे काप आणि टोमॅटोचे कापने सजवा
  • मध्ये मध्ये व्हाईट सॉस घाला
  • लाल मिरची पावडर भुरभुरवा
  • आता पिझ्झ्याची प्लेट कढईत ठेवा आणि मंद आचेवर २० ते २२ मिनटं बेक करा
  • छान मस्त पिझ्झा तयार झालाय ! कापून सर्व्ह करा

Leave a Reply