कुकर मध्ये केक स्पॉंज बनवतांना कुकर थोडा ऊंच घ्यावा (साधारण १० लिटर). केक टिनच्या वर भरपूर जागा मिळाल्याने हवेच्या उष्णतेने स्पॉंज वरच्याबाजूने सुद्धा छान बेक होतो
कुकरच्या मध्ये तळाला मीठ किंवा बारीक वाळू वापरावी म्हणजे उष्णता सगळीकडे पसरते आणि केक स्पॉंज सर्व बाजूने छान बेक होतो. मीठ किंवा वाळू न वापरता पण स्पॉंज बेक होतो परंतु बेकिंग असमान होऊ शकते
मीठ वापरल्यास आधी झाकण काढून ५-१० मिनिट कुकर गरम करून घ्यावा म्हणजे मिठाचा वास निघून जाईल आणि केकला तो लागणार नाही
मिठाच्या लेयरवर वाटी किंवा लोखंडी स्टॅन्ड ठेवा जेणेकरून थोडी उंची मिळेल आणि केक खालून जळणार नाही
कुकरच्या झाकणाची रिंग तसेच शिटी काढून घ्यावी जेणेकरून आतमध्ये खूप प्रेशर होऊन केक स्पॉंज जळणार नाही
मंद ते माध्यम आचेवर कुकर आधी प्रीहीट करून घ्यावा ७. कुकरमध्ये मंद ते माध्यम आचेवरच केक बेक करावा वरील सर्व गोष्टी पाळल्यास केक छान स्पॉंजी आणि व्यवस्थित बेक होतो
केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. त्यासाठी लिंक्स खाली देत आहे