ज्यावेळी आपण एखाद्या पुस्तकात किंवा मॅगझीन मध्ये एखाद्या केकचा छान फोटो बघतो तेंव्हा आपण तो प्रत्यक्ष करतेवेळी रेसिपी पासून भरकटण्याची शक्यता असते. म्हणून रेसिपी पूर्ण वाचणे गरजेचे असते.
महत्वाचा प्रश्न विचारा कि “तुमच्याकडे आवश्यक ते सर्व साहित्य आणि आवश्यक तो वेळ आहे का?”
रेसिपी मध्ये दिलेले साहित्याची यादी करून सर्व साहित्य जमवा आणि मगच प्रत्यक्ष पदार्थ बनवायला घ्यावा. पदार्थ बनवतांना साहित्याची जमवाजमव करणे म्हणजे तुमचा पदार्थ पूर्णपणे बिघडून घेणे होय. तसेच कुठल्याही साहित्याला पर्यायी साहित्य घेऊ नये.