यापूर्वीच्या रेसिपी मध्ये आपण रवा केक बनवायला शिकलो. पण अनेकांचे मेसेज आले कि बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा याच्याशिवाय घरच्या घरी अगदी घरगुती साहित्यातून रवा केक बनवायला शिकवा म्हणून. त्यामुळे आज इथे देत आहे एक अशीच रेसिपी. खालील रेसिपी तंतोतंत पाळा आणि बघा कमाल, तुम्ही बनवाल एकदम स्पॉंजी रवा केक घरच्या घरी !
साहित्य
- 1 कप पिठीसाखर
- अर्धा कप दही
- अर्धा कप तेल / बटर / तूप
- अर्धा कप मैदा
- दीड कप बारीक रवा
- चवीनुसार व्हॅनिला इसेन्स / वेलदोड्याची पूड
- अर्धा कप दूध
- 1 पॅकेट रेगुलर प्लेन इनो (किंवा अर्धा चमचा खायचा सोडा आणि १ चमचा बेकिंग पावडर)
- टुटी फ्रुटी गरजेनुसार
- २ कप पाणी
कृती
- प्रथम पाणी कुकर मध्ये गरम करायला ठेवा
- दही आणि पिठी साखर छान मिक्स करून घ्या. दह्याच्या गुठळ्या सर्व काढून टाका
- वरील मिश्रणात अर्धा कप तेल / बटर / तूप यापैकी काहीही घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या
- यात अर्धा कप मैदा आणि दीड कप रवा घाला आणि एकजीव करून घ्या. सर्व गुठळ्या काढून घ्या
- यात छान फ्लेवर येण्यासाठी असल्यास व्हॅनिला इसेन्स घाला. याची सक्ती नाहीये. वाटल्यास वेलदोड्याची पूड घालू शकता. इसेन्स घालून पुन्हा मिक्स करा
- मिश्रण खूप घट्ट झालेलं असणार म्हणून यात आपण घालणार आहोत थोडे दूध आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. दूध गरजेनुसार घाला. संपूर्ण दूध वापरायची गरज नाही
- वरील मिश्रण/बॅटर २० मिनिटे झाकून ठेवा
- २० मिनिटानंतर बॅटर मध्ये उरलेले दूध घाला आणि पुन्हा मिक्स करून घ्या
- नंतर १ पॅकेट इनो घाला व थोडी टुटी फ्रुटी मिक्स करा आणि २ ते ३ मिनिटे मिक्स करून घ्या
- भांडे ज्यात स्पॉंज बनवायचा आहे त्याला थोडे तेल लावून घ्या आणि वरील बॅटर ओता आणि एकसमान करून घ्या. वरून टुटी फ्रुटी पेरा.
- कुकर मधील पाण्याला एव्हाना उकळी फुटली असेल
- आता बॅटर चे भांडे कुकर मध्ये एका स्टॅन्ड वर ठेवा
- कुकरच्या झाकणाची रिंग व शिटी काढून टाका आणि झाकण लावा
- केक २५ ते ३० मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या
- गॅस बंद करून कुकरचे झाकण हळूच उघडा आणि केक शिजलाय का नाही ते टूथपिक च्या मदतीने पाहून घ्या
- थंड झाल्यावर केक भांड्यातून बाहेर काढा
- तुमचा छान स्पॉंजी रवा केक आता तयार झालाय. आता कापून सर्व करा