Sale!

51 Mango Recipes Ebook (Marathi)

49

उन्हाळा आणि फळांचा राजा आंबा यांचे एक अनोखे नाते आहे. आंब्याचे विविध उपयोग पाहता आपल्या आहारात त्याचा समावेश असणे गरजेचे आहे. ह्या पुस्तकात मुद्दाम फक्त पिकलेल्या आंब्याचा ५१ रेसिपीज समाविष्ट केल्या आहेत. अगदी आंबा केक पासून, आंबा पोळी ते मँगो कँडी, मँगो मस्तानी, मँगो स्मुदी, मँगो पंच, आंबा बर्फी, आम्रखंड, मँगो आईस्क्रिम पर्यंत सर्व रेसिपीज ह्या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळे ज्यांना पिकलेला आंबा आवडतो त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे मेजवानीच ठरणार आहे. हे पुस्तक आम्ही लाँच ऑफर मध्ये अत्यल्प शुल्कात उपलब्ध करून देत आहोत.

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: MLF-Book-51MRM Category:

Description

उन्हाळा आणि फळांचा राजा आंबा यांचे एक अनोखे नाते आहे.आंब्यांची चव चाखण्यासाठी प्रत्येकाला उन्हाळाला हवाहवासा वाटतो. कधी एकदा आंबा खातो असे सर्वांना झालेले असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आंबा सर्वांनाच आवडतो. अतिशय मधुर आणि कितीही खाल्ले तरी मन न भरणारे हे फळ न आवडणारे क्वचितच.कैऱ्या बाजारात दिसू लागल्या, की आंब्याच्या मोसमाची चाहूल लागते. कैरीच्या लोणच्यापासून ते मॅंगो मिल्कशेक, मॅंगो आईस्क्रीम, आम्रखंड, अशा विविध पदार्थांनी स्वयंपाकघर गजबजून जाते.

आंब्याचे विविध फायदे

१. आंबा अवीट गोडीचे स्वादिष्ट फळ आहे पण त्यात फॅट म्हणजे स्निग्धांश नाहीत. त्यामुळे आंबे जास्त खाल्याने वजन वाढते हा गैरसमज आहे.
२. आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू (उत्ती) व स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. आंब्यात असणारे कॅरोटीनॉइड त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करते.
३. आंबा विटॅमिन आणि खनिजांचा चांगला स्त्रोत असल्याने शरीराला हायड्रेटेट ठेवतो.
४. शरीराचा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आंबा फायदेशीर ठरतो.
५.आंबा थोडा कच्चा असतो तेव्हा त्यात सी व्हिटामिन भरपूर असते पण आंबा पिवळा होऊन पिकला कि त्यात ए व्हिटामिन वाढते.व्हिटॅमिन ए मुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आंबा उत्तम फळ आहे. यामुळे त्वचेचा पोत सुधारतो तसेच कांती सुधारते.
६. आंब्यात व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणात असते जे तुमच्या मेंदूच्या विकासासाठी महत्वाचे असते. आंबा खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते
७. तसेच ‘व्हिटामिन सी’ मुळे शरीरात अपायकारक रॅडीकल्सशी सामना करण्याची क्षमता वाढते.आंब्यात मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स असतात जी कॅन्सर ह्या आजारात पेशींचे पुढील नुकसान टाळण्यास मदत करतात
८. आंब्यामुळे आतड्यांचे, स्तनाचे व प्रोस्टेट ग्रंथींचा कर्करोग होण्यापासून बचाव होण्यास मदत होते. तसेच आंब्यात कॅरोटिन असल्याने फुफ्फुसाच्या कर्करोगापासूनही बचाव होतो.
९. आंब्यात सोडियम आणि कोलेस्ट्रोलही नाही. त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनाही त्याचे सेवन करता येते.
१०. आंब्यामध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि तांबे भरपूर प्रमाणात असते.
११. ऍनिमियाच्या रुग्णांसाठी आंबा नैसर्गिक वरदान आहे. आंब्यात असणारं लोह शरीरासाठी फायदेशीर आहे. आयर्न आणि कॅल्शियम वाढवण्यासाठी आंबा अतिशय गुणकारी आहे.
१२. आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत होते.
१३. ‘व्हिटामिन बी6’ मुळे रक्तातील ‘होमोसेस्टीना’चे प्रमाण संतुलित राहते व हृद्यविकाराचा धोका कमी होतो.
१४. आंब्यात झिंक मोठ्या प्रमाणात असंत. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.१५. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच चेहरा तजेलदार आणि सुंदर कांती कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “51 Mango Recipes Ebook (Marathi)”

Your email address will not be published.