Basic Chocolate Making Masterclass (Marathi)

introduction and raw material

प्रोफशनल चॉकलेट बनवायला शिका अगदी शून्यातून. अगदी साहित्य कसे निवडावे, वस्तू कुठून व कोणत्या घ्याव्यात पासून योग्य आणि कमीत कमी साहित्य कसे निवडावे ते आम्ही तुम्हाला शिकवू तसेच चॉकलेट बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचा आढावा घेऊ

Plane chocolate making

सुरवात करा प्रत्यक्ष चॉकलेट बनवायला. चॉकलेट स्लॅब मेल्ट करण्याच्या विविध शिका. अगदी ओव्हन नसेल तरी गॅस शेगडी वर तुम्ही स्लॅब मेल्ट करू शकता. ह्या सेक्शन मध्ये तुम्ही शिकणार प्लेन चॉकलेट बनवायला. प्लेन मिल्क, डार्क आणि व्हाईट चॉकलेट कशी बनवायची हे आपण शिकणार आहोत अगदी सोप्या मराठीतून आणि प्रत्यक्ष व्हिडीओ कृतीतून

flavored chocolate making

ह्या ऍडव्हान्स सेक्शन मध्ये तुम्ही शिकणार फ्लेवर्ड चॉकलेट कशा बनवायच्या ते. विविध प्लेन फ्लेवर जसे मँगो, पिस्ता, पान मसाला, ड्राय फ्रुट पासून ते डबल लेयर चॉकलेट पर्यंत आणि चॉकलेट बार पासून ते लॉलीपॉप चॉकलेट पर्यंत सर्व काही शिकणार सहज सोप्या मराठी भाषेतून व्हिडीओ लेसन्स च्या माध्यमातून. शेवटी आपण चॉकलेट रॅप कसे करायचे आणि गिफ्ट पॅक कसे करायचे तेही शिकणार आहोत. हा क्लास शिकल्यानंतर तुम्ही स्वतःचा चॉकलेट विक्रीचा व्यवसाय सुद्धा करू शकाल 

Take your life to the next level !

Course Instructor

आपण नेहमी एक्स्पर्ट काढून शिकावे. आपल्या प्रशिक्षक हर्षाली कापडणीस ह्या क्षेत्रातल्या अनुभवी असून अगदी सहज आणि सोप्या मराठी भाषेत शिकवण्यात त्यांचा हातकंडा आहे.  प्रशिक्षक मोठे केक शॉप चालवतात ज्यात त्यांनी स्वतः बनवलेले केक/चॉकलेट्स खूप लोकप्रिय आहेत. त्या स्वतः उच्चशिक्षित म्हणजे M.Sc. (Chemistry) झालेल्या आहेत आणि १० वर्षांपूर्वी केवळ आवडीमुळे त्यांनी फूड अँड बेकरी क्षेत्रात पदार्पण केले. हर्षाली यांच्या केक, चॉकलेट, टोस्ट ब्रेड खारी, आईस्क्रिम, टी टाईम मेनू अशा अनेक प्रकारच्या कार्यशाळा लोकप्रिय आहेत. आता पर्यंत शेकडो लोकांनी त्यांच्या कार्यशाळा केलेल्या असून अनेक विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने पण शिक्षण घेत आहेत.

सुंदर आणि चविष्ट चॉकलेट्स जेंव्हा तुम्ही आवडीने काम करतात. तुम्ही सहज सोप्या टेक्निक्स मधून अतिशय सुंदर डिझाईन करू शकता. अशाच प्रकारच्या अनेक वर्षांच्या अनुभवातून त्या आज लोकप्रियता आणि यश प्राप्त करू शकल्या आहेत. त्यांच्या वर्गातून शिकून अनेक स्त्रिया आत्मनिर्भर झाल्या असून आज होम बेकिंग व्यवसाय सुरु करून स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.

Student Reviews

आमचे विद्यार्थी आमची संपत्ती आहे. काही मोजके अभिप्राय खाली देत आहोत .

” मी कोर्स केल्यानंतर लगेचच स्वतःचा होम बेकिंग व्यवसाय सुरु करू शकले. खूप वर्षांपासून हाऊस वाईफ होते. स्वतःचे एक स्थान आणि स्पेस मिळवू शकली. कोर्सचे पैसे पहिल्या दोन ऑर्डर मध्येच वसूल झाले “

विणा पाटील

Successful Home Baker​

मला कुकिंग ची आवड आहे म्हणून हा कोर्स केला. हर्षाली प्रत्येक गोष्ट खूप व्यवस्थित समजाऊन सांगतात.  खूप सोपी पद्धत आणि उत्तम माहिती दिलीय कोर्स मध्ये  “

कविता जाधव

Teacher​

” खूप छान व मनमोकळेपणाने व कुठलीही गोष्ट न लपवता शिकवले आहे. खूप सोपी मराठी भाषा आणि आपल्यातल्याच एक वाटतात. अजिबात व्यावसायिकता दिसत नाही. धन्यवाद “

अनिका सरदेसाई

IT Professional

Frequently Asked Questions

सतत विचारले जाणारे काही प्रश्न खाली देत आहोत.

कोर्स चे स्वरूप कसे असणार?

कोर्स ऑनलाईन व्हिडिओ स्वरूपात असणार. पहिल्या लेसन पासून तर शेवटच्या लेसन पर्यंत एका क्रमाने तुम्ही सर्व गोष्टी शिकत जाणार. अगदी बेसिक्स पासून तर उत्तम पदार्थ बनवता येतील इथपर्यंत मुद्देसूद आणि सोप्या मराठीत सर्व धडे असतील. सर्व व्हिडिओ अत्यंत चांगल्या दर्जाचा कॅमेरा वापरून चित्रांकन केलेले आहेत. सर्व लेसन्स व्हिडिओ स्वरूपात असल्याने आपल्याला प्रत्यक्ष कार्यशाळेत बसून कोर्स शिकल्याचा अनुभव येतो.

कोर्स कसा बघता येईल?

कोर्स ऑनलाईन स्वरूपात आमच्या वेबसाइट वर उपलब्ध आहे. नमूद केलेली फीस भरून झाल्यावर आपल्याला लॉगिन पासवर्ड दिला जाईल. आपल्या लॉगिन ला कोर्स चा ऍक्सेस दिला जाईल.

कोर्स चा ऍक्सेस किती दिवस राहील?

आपण निवडलेल्या प्लॅन नुसार कोर्स ऍक्सेस असेल. समजा आपण एक वर्षाचा ऍक्सेस प्लॅन घेतला तर आपल्याला एक वर्ष आपल्या लॉगिन ला कोर्स उपलब्ध राहील.

कोर्स किती वेळा बघता येईल?

कोर्स तुम्ही ज्या कालावधीसाठी घेतला आहे त्या कालावधीत कितीही वेळा, पुन्हा पुन्हा, आपल्या वेळेनुसार कधीही बघता येईल, आपल्या सोयीने आणि आपल्या वेगाने शिकता येईल.

कोर्स कुठून बघता येईल?

कोर्स कुठल्याही डिव्हाईस वरून बघता येईल – मोबाईल फोन, लॅपटॉप, कॉम्पुटर, टॅब कुठूनही बघता येईल. फक्त इंटरनेट कनेक्शन जरुरी असेल.

कोर्सच्या नोट्स मिळतील का?

हो कोर्स च्या नोट्स कोर्स मध्येच मिळतील. तुम्ही कोर्स मध्ये नोंदणी केल्यानंतर व्हिडिओ लेसन्स बरोबर जिथे आवश्यक असेल तिथे तुम्हाला नोट्स देखील उपलब्ध होतील

Expect the unexpected, and whenever possible, be the unexpected.

Click Here to Whatsapp Us !

Call Us !

9730326375