प्रोफशनल केक बनवायला शिका अगदी शून्यातून. अगदी साहित्य कसे निवडावे, वस्तू कुठून व कोणत्या घ्याव्यात पासून ते सोप्या पद्धतीने केक बेस कसा बनवावा पर्यंत आणि बेस कटिंग पासून ते केक वरील क्रिम च्या आयसिंग टेक्निक पर्यंत. योग्य आणि कमीत कमी साहित्य कसे निवडावे ते आम्ही तुम्हाला शिकवू तसेच केक बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचा आढावा घेऊ.
वॅनिला स्पॉंज / बेस बनवतांना वॅनिला फ्लेवर किंवा इमल्शन चा वापर केला जातो. नंतर आईसिंग करतांना वेगवेगळे क्रश वापरून आपण हवा तो केक तयार करू शकतो. चॉकलेट स्पॉंज / बेस बनवतांना चॉकलेट स्लॅब चा वापर केला जातो. ह्या स्पॉंज पासून आपण चॉकोलेट केक, चॉकलेट घनाश, रिच ट्रफल असे विविध चॉकोलेट केक बनवू शकतो. आपण स्पॉंज प्रेशर कुकर मध्ये कसा बनवायचा ते शिकणार आहोत. आपण उत्तम प्रकारे व्हीप क्रिम कसे करायचे ते शिकणार आहोत
आपण नेहमी एक्स्पर्ट काढून शिकावे. आपल्या प्रशिक्षक हर्षाली कापडणीस
सुंदर केक तेंव्हाच बनतो जेंव्हा तुम्ही आवडीने काम करतात. तुम्ही सहज सोप्या टेक्निक्स मधून अतिशय सुंदर डिझाईन करू शकता. अशाच प्रकारच्या अनेक वर्षांच्या अनुभवातून त्या आज लोकप्रियता आणि यश प्राप्त करू शकल्या आहेत. त्यांच्या वर्गातून शिकून अनेक स्त्रिया आत्मनिर्भर झाल्या असून आज होम बेकिंग व्यवसाय सुरु करून स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.
आमचे विद्यार्थी आमची संपत्ती आहे. काही मोजके अभिप्राय खाली देत आहोत .
” मी कोर्स केल्यानंतर लगेचच स्वतःचा होम बेकिंग व्यवसाय सुरु करू शकले. खूप वर्षांपासून हाऊस वाईफ होते. स्वतःचे एक स्थान आणि स्पेस मिळवू शकली. कोर्सचे पैसे पहिल्या दोन ऑर्डर मध्येच वसूल झाले “
Successful Home Baker
” मला कुकिंग ची आवड आहे म्हणून हा कोर्स केला. हर्षाली प्रत्येक गोष्ट खूप व्यवस्थित समजाऊन सांगतात. कमीत कमी साहित्यात केक कसा बनवायचा हे पण शिकले. खूप सोपी पद्धत आणि उत्तम माहिती दिलीय कोर्स मध्ये “
Teacher
” खूप छान व मनमोकळेपणाने व कुठलीही गोष्ट न लपवता शिकवले आहे. खूप सोपी मराठी भाषा आणि आपल्यातल्याच एक वाटतात. अजिबात व्यावसायिकता दिसत नाही. मी लगेच केक बनवायला शिकली आणि मुलांना वीकएंडला माझ्या हाताने बनवलेले केक खाऊ घालतांना एक वेगळा आनंद सध्या एन्जॉय करतेय. धन्यवाद “
IT Professional
सतत विचारले जाणारे काही प्रश्न खाली देत आहोत.
कोर्स ऑनलाईन व्हिडिओ स्वरूपात असणार. पहिल्या लेसन पासून तर शेवटच्या लेसन पर्यंत एका क्रमाने तुम्ही सर्व गोष्टी शिकत जाणार. अगदी बेसिक्स पासून तर उत्तम पदार्थ बनवता येतील इथपर्यंत मुद्देसूद आणि सोप्या मराठीत सर्व धडे असतील. सर्व व्हिडिओ अत्यंत चांगल्या दर्जाचा कॅमेरा वापरून चित्रांकन केलेले आहेत. सर्व लेसन्स व्हिडिओ स्वरूपात असल्याने आपल्याला प्रत्यक्ष कार्यशाळेत बसून कोर्स शिकल्याचा अनुभव येतो.
कोर्स ऑनलाईन स्वरूपात आमच्या वेबसाइट वर उपलब्ध आहे. नमूद केलेली फीस भरून झाल्यावर आपल्याला लॉगिन पासवर्ड दिला जाईल. आपल्या लॉगिन ला कोर्स चा ऍक्सेस दिला जाईल.
आपण निवडलेल्या प्लॅन नुसार कोर्स ऍक्सेस असेल. समजा आपण एक वर्षाचा ऍक्सेस प्लॅन घेतला तर आपल्याला एक वर्ष आपल्या लॉगिन ला कोर्स उपलब्ध राहील.
कोर्स तुम्ही ज्या कालावधीसाठी घेतला आहे त्या कालावधीत कितीही वेळा, पुन्हा पुन्हा, आपल्या वेळेनुसार कधीही बघता येईल, आपल्या सोयीने आणि आपल्या वेगाने शिकता येईल.
कोर्स कुठल्याही डिव्हाईस वरून बघता येईल – मोबाईल फोन, लॅपटॉप, कॉम्पुटर, टॅब कुठूनही बघता येईल. फक्त इंटरनेट कनेक्शन जरुरी असेल.
हो कोर्स च्या नोट्स कोर्स मध्येच मिळतील. तुम्ही कोर्स मध्ये नोंदणी केल्यानंतर व्हिडिओ लेसन्स बरोबर जिथे आवश्यक असेल तिथे तुम्हाला नोट्स देखील उपलब्ध होतील