You are currently viewing मँगो केक स्पॉंज रेसिपी

मँगो केक स्पॉंज रेसिपी

साहित्य

 • पाव कप तेल
 • अर्धा कप घट्टसर आंब्याचा रस (पेस्ट)
 • अर्धा कप साखर
 • अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स
 • सव्वा कप बारीक मैदा
 • दीड टीस्पून बेकिंग पावडर
 • पाव टीस्पून बेकिंग सोडा
 • पाव टीस्पून मीठ
 • अर्धा कप दूध 

कृती 

 • केक टिन तेलाने छान ग्रीस करून घ्या आणि पार्चमेंट पेपरने कव्हर करा
 • एक बाउल मध्ये तेल घ्या
 • त्यात घट्टसर आंब्याचा रस घाला
 • साखर घालून छान मिक्स करून घ्या. पूर्ण साखर विरघळली पाहिजे
 • आता व्हॅनिला इसेन्स घाला आणि व्यवस्थित मिक्स करा
 • यात चाळणी धरून त्यात मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ घाला आणि मिश्रण चाळून घ्या
 • सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्या
 • आता दूध घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या
 • वरील मँगो बॅटर केक टिन मध्ये घाला 
 • कढई मध्ये भांड्याचा स्टॅन्ड ठेवा आणि झाकण ठेवून गॅसवर १० मिनिटे गरम करा
 • नंतर वरील बॅटर घातलेला टिन कढईत ठेवा झाकण ठेवून मंद आचेवर ४०-४५ मिनिटे बेक करा
 • वरील वेळेनंतर वूडन स्टिक घालून केक बेक झालाय का ते पहा
 • बेक झालेला टिन काढून थंड करा आणि केक मोल्ड मधून बाहेर काढा
 • तुमचा मँगो केक स्पॉंज तयार झालाय 

वर दिलेल्या रेसिपीतील साहित्य तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. त्यासाठी लिंक्स खाली देत आहे 

As an Amazon Associate I earn from qualifying purchases

अशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Reply