व्हीप क्रिम बनवा दुधापासून – घरगुती रेसिपी !

साहित्य

  • अर्धा लिटर दूध (शक्यतो फुल क्रिम दूध)
  • पाव कप पीठी साखर
  • १ टीस्पून कॉर्नफ्लोअर पावडर

कृती

  • दूध तापवून उतू येऊ द्याभांड्याच्या वरपर्यंत आल्यावर गॅस बंद करा आणि १ ते २ मिनटं तसेच ठेवून द्या
  • वरती साय तयार होईल
    गाळून साय बाजूला काढा
  • दूध पुन्हा तापवा व १-२ मिनटं थांबून साय पुन्हा गाळून घ्या
    असे पुन्हा पुन्हा करून पुरेशी साय जमवा
  • लक्षात ठेवा दूध खूप थंड करू नका उकळल्यावर १-२ मिनटं फक्त बाजूला ठेवून साय जमू द्यायची आणि लगेच गाळून घ्यायचे
  • गाळून घेतलेली साय घट्ट दुधासारखी दिसेल
  • १ तास फ्रिजमध्ये ठेवा
  • आता पिठी साखर आणि कॉर्नफ्लोअर पावडर घेऊन बारीक एकसमान ग्राइंड करून घ्या, म्हणजे तुमची आईसिंग शुगर बनेल
  • एक तासानंतर क्रिम बाहेर काढून इलेक्ट्रिक हॅन्ड ब्लेंडरने जास्त स्पीडला घुसळा
  • आता क्रीम व्हीप व्हायला लागेल
  • चवीनुसार आईसिंग शुगर घाला आणि पुन्हा ब्लेंड (बिट) करा
  • वातावरणात उष्णता असेल तर बिट करताना बाउलच्या खाली एका भांड्यात आईस क्युब्स ठेवा म्हणजे क्रिम वितळणार नाही
  • शेवटी क्रिम छान बनल्यावर आईसिंग साठी वापरा

अशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Reply