You are currently viewing सर्वात मऊ चॉकलेट केक स्पॉंज बनवा कंडेन्स्ड मिल्क वापरून

सर्वात मऊ चॉकलेट केक स्पॉंज बनवा कंडेन्स्ड मिल्क वापरून

साहित्य

 • एक कप दूध (सामान्य तापमानाला)
 • दीड चमचा व्हिनेगर (किंवा दोन टीस्पून लिंबाचा रस)
 • तीन टेबलस्पून तेल (सनफ्लावर तेल)
 • तीन टेबलस्पून बटर
 • तीन टेबलस्पून पिठी साखर
 • पाऊण कप कंडेन्स्ड मिल्क (मिल्कमेड किंवा अमूल मिठाईमेट)
 • दीड कप मैदा
 • चार टेबलस्पून कोको पावडर
 • दीड टीस्पून बेकिंग पावडर
 • अर्धा टीस्पून बेकिंग सोडा

कृती 

 • एका बाउल मध्ये दूध घेऊन त्यात व्हिनेगर घालून छान मिक्स करून घ्या आणि १० मिनिटे झाकून ठेवा
 • दुसऱ्या बाउल मध्ये तेल, बटर व साखर घालून व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घ्या (१ मिनिट)  
 • वरील मिश्रणात आता कंडेन्स्ड मिल्क घालून एकजीव करून घ्या (२-३ मिनिट)
 • तिसऱ्या बाउलवर चाळणी ठेवून त्यात मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून एकत्रितपणे चाळून घ्या
 • पहिले आणि दुसऱ्या बाउल मधील मिश्रण एकत्र करून आणि छान मिक्स करून घ्या
 • यात तिसऱ्या बाउल मधील म्हणजे मैद्याचे मिश्रण घालून छान मिक्स करून घ्या
 • खूप जास्त वेळ किंवा खूप जास्त जोरात मिक्स करू नका नाहीतर केक थोडा हार्ड होईल
 • केक टिन तेलाने छान ग्रीस करून घ्या आणि पार्चमेंट पेपरने कव्हर करा आणि वरील बॅटर केक टिन मध्ये घाला 
 • ओव्हन १८० डिग्रीला १० मिनिटे प्रीहीट करून घ्या  
 • नंतर वरील बॅटर घातलेला टिन ओव्हन उघडून आतमध्ये स्टॅन्डवर ठेवा ओव्हन बंद करून १८० डिग्रीला ३० ते ३५ मिनिटे बेक करा 
 • वरील वेळेनंतर वूडन स्टिक घालून केक बेक झालाय का ते पहा. वूडन स्टिकला केक लागला नाही म्हणजे केक बेक झालाय असे समजावे 
 • बेक झालेला टिन काढून थंड करा आणि केक मोल्ड मधून बाहेर काढा 
 • तुमचा एकदम सॉफ्ट चॉकलेट केक स्पॉंज तयार झालाय

वर दिलेल्या रेसिपीतील साहित्य तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. त्यासाठी लिंक्स खाली देत आहे 

Vinegar
https://amzn.to/3gstUds
Amul Butter
https://amzn.to/3gdluI9
Condensed Milk (Amul Mithai Mate)
https://amzn.to/3cyFDX0
Wheat Maida
https://amzn.to/35eDqvq
Cocoa Powder
https://amzn.to/3pIZqbs
Baking Powder
https://amzn.to/3v8P71z
Baking Soda and Baking Powder
https://amzn.to/3cAztW3

As an Amazon Associate I earn from qualifying purchases

अशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Reply