साहित्य
- २०० ग्रॅम मैदा (१ मोठा कप किंवा पाण्याचा ग्लास)
- अर्धा चमचा मीठ
- १ चमचा साखर
- ३ चमचे तेल
- अर्धा पॅकेट रेगुलर इनो (फ्लेवर विरहित)
- २ चमचे दूध
- ४ चमचे दही
कृती
- एका भांड्यात मैदा घेऊन त्यात मीठ, साखर, दही घाला आणि छान मिक्स करून घ्या
- यात इनो घालून हाताने छान मिक्स करून घ्या
- नंतर हळू हळू पाणी घालून छान कणिक मळून घ्या. कणिक तयार झाल्यावर १५-२० मिनिटे आणखी मळा
- नंतर थोडे तेल घाला आणि पुन्हा ५ मिनिटे मळून घ्या
- अलुमिनियम किंवा नॉन स्टिक चे पातळ भांडे घ्या आणि आतून तेलाचा ब्रश फिरवा व सगळीकडे मैदा भूरभूरवा
- नंतर कणकेचे एकसमान गोळे करा. गोळे करताना गरज पडल्यास थोडा मैदा वापरा
- पावाचे गोळे भांड्यात ठेवा आणि प्रत्येक गोळ्याच्या वरील भागाला दुधाच्या ब्रशने ग्रीसिंग करा (तत्पूर्वी दुधात थोडी साखर घाला)
- भांड्याला ओल्या फडक्याने झाका आणि १० मिनिटे ठेवून द्या
- कुकर मध्ये तळाला मीठ घाला व वरून स्टॅन्ड ठेवा, कुकरच्या झाकणाची शिटी, रिंग काढून झाकण लावा आणि ५ मिनिटे गॅस वर कुकर प्रीहीट करण्यासाठी ठेवा
- कुकर प्रीहीट झाल्यावर पावगोळे ठेवलेले भांडे कुकर मध्ये स्टॅन्ड वर ठेवा व झाकण लावा (शिटी आणि रिंग नको)
- नंतर पहिले १० मिनिट मोठ्या आचेवर आणि पुढील १० मिनिटे मंद आचेवर बेक करा
- एकदा झाकण उघडून चेक करा
- बेकिंग झाल्यावर झाकण उघडा आणि भांडे बाहेर काढून घ्या
- भांड्यात पाव असताना वरून ब्रशने तेल किंवा बटरने ग्रीसिंग करा
- भांड्याला ओल्या फडक्याने झाका आणि १० मिनिटे ठेवून द्या
- शेवटी पाव भांड्यातून बाहेर काढून वापरा
सूचना
- वरील कृतीत यीस्ट, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा वापरलेला नसल्याने पाव खूप स्पॉंजी होत नाहीत
- वरील कृती तंतोतंत पाळली तरी सुद्धा बाकी इतर अनेक गोष्टींमुळे पाव थोडा कडक किंवा कमी जास्त बेक होऊ शकतो
- थोड्या प्रॅक्टिसने पाव व्यवस्थित बनायला लागतील
- स्टीलचे भांडे वापरू नये. केकचा राऊंड नॉन-स्टिक मोल्ड किंवा अलुमिनियम मोल्ड घेतल्यास उत्तम
- पाव सॉफ्ट व स्पॉंजी होण्यासाठी महत्वाच्या स्टेप्स – कणिक छान मळणे, सुरवातीला पावाच्या गोळयांना साखर दुधाच्या पाण्याने ग्रीसिंग करणे, बेकिंग पूर्वी ओल्या फडक्याने झाकणे, बेकिंग नंतर तेल किंवा बटरने पावांना ग्रीसिंग करणे, शेवटी ओल्या फडक्याने झाकून ठेवणे