कंडेन्स्ड मिल्क केक बेकिंग मधील महत्वाचा घटक पदार्थ आहे. कंडेन्स्ड मिल्कने जी केकला टेस्ट येते ती कुठल्याही प्रिमिक्स किंवा अन्य केकला येत नाही. याचा वापर केक स्पॉंज छान फुगण्यासाठीही केला जातो. बाजारात मिळणारे कंडेन्स्ड मिल्क तुलनेने खूप महाग असते. जर तुम्ही हि रेसिपी वापरून कंडेन्स्ड मिल्क केले तर तुम्हाला निम्म्याहून कमी किमतीत हे कंडेन्स्ड मिल्क तयार करता येते.