You are currently viewing कंडेन्स्ड मिल्क बनवा फक्त दूध आणि साखरेपासून – अगदी मिल्कमेड किंवा अमूल मिठाईमेट सारखे

कंडेन्स्ड मिल्क बनवा फक्त दूध आणि साखरेपासून – अगदी मिल्कमेड किंवा अमूल मिठाईमेट सारखे

साहित्य

  • अर्धा लिटर दूध  
  • साखर – २०० ग्रॅम
  • बेकिंग सोडा – चिमूटभर 

कृती 

  • एक मोठी कढई घेऊन गॅसवर ठेवा आणि त्यात अर्धा लिटर दूध घाला
  • त्यात साखर घालून चमच्याने सतत ढवळा
  • उकळून उकळून दूध अर्ध्यापेक्षा कमी झाले पाहिजे
  • पहिल्या उकळीनंतर तुम्ही फ्लेम कमी करू शकता
  • या रेसिपीसाठी तुम्हाला २० ते २५ मिनिटे लागतील
  • दूध आटल्यावर गॅस बंद करून मिश्रणात बेकिंग सोडा घाला
  • छान मिक्स करून थंड करा
  • तुमचे कंडेन्स्ड मिल्क तयार आहे. आता कुठल्याही केक स्पॉन्जच्या रेसिपीत तुम्ही वापरू शकता

काही सूचना व माहिती

  • बेकिंग सोडा घातल्याने कॅरॅमल फ्लेवर येणार. सुरुवातीला घालू नका नाहीतर आपले कंडेन्स्ड मिल्क ब्राउन कलरचे होईल  
  • नेहमीच्या दुधापेक्षा हे दूध जास्त उतू जाते म्हणून मोठी कढई घ्या
  • खूप घट्ट झाल्यास मिक्सर मधून फिरवून घ्या किंवा थोडे दूध घाला
  • खूप पातळ झाल्यास परत उकळवा
  • घरी बनवल्यास अर्ध्या किमतीत कंडेन्स्ड मिल्क बनते    
  • कंडेन्स्ड मिल्कने केक स्पॉंजला छान टेस्ट येते शिवाय केक स्पॉंज छान फुलतो आणि कोरडा किंवा कडक होत नाही
  • एगलेस केकमध्ये अंड्याच्या जागी कंडेन्स्ड मिल्क सुचवले जाते

वर दिलेल्या रेसिपीतील साहित्य तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. त्यासाठी लिंक्स खाली देत आहे 

As an Amazon Associate I earn from qualifying purchases

अशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Reply