You are currently viewing नाचणीपासून बनवा हेल्दी केक !

नाचणीपासून बनवा हेल्दी केक !

साहित्य

  • अर्धा कप बटर
  • १ कप गूळ पावडर
  • अर्धा कप दही
  • १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स / वेलदोडे पावडर
  • १ कप नाचणी पीठ
  • १ कप गव्हाचे पीठ
  • पाव कप कोको पावडर
  • दीड टीस्पून बेकिंग पावडर
  • अर्धा टीस्पून बेकिंग सोडा
  • सव्वा कप दूध 

कृती

  • एका बाउल मध्ये बटर घेऊन त्यात गूळ पावडर, दही, व्हॅनिला इसेन्स घाला  गूळ पावडर पूर्णपणे मिक्स होईपर्यंत मिसळून घ्या
  • बाउल वर चाळणी ठेवून वरील मिश्रणात नाचणी पीठ, गव्हाचे पीठ,कोको पावडर,बेकिंग पावडर, बेकिंग सोडा गाळून घ्या
  • सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्या
  • आता हळूहळू दूध घालून छान मिक्स करून घ्या
  • छान स्मूथ बॅटर तयार झाले पाहिजे
  • केकचे भांडे आतून बटरने ग्रीसिंग करून घ्या
  • आता बॅटर केकच्या भांड्यात ओता
  • भांडे थोडे आपटून घ्या म्हणजे बॅटर छान स्प्रेड होईल
  • ओव्हन १८० डिग्रीला १० मिनिट प्रीहीट करा
  • आता केकचे भांडे ओव्हन मध्ये ठेवून २५ ते ३० मिनिट बेक करा
  • २० मिनिटानंतर टूथपिक किंवा चाकू घालून केक शिजलाय का ते चेक करा
  • शिजल्यावर बाहेर काढून थंड करा व नंतर केक बाहेर काढा
  • आता तुमचा छान नाचणीचा केक तयार झालाय !

अशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Reply