कित्येकदा आपल्याला टॉल केक किंवा डॉल केक किंवा २-३ टायर केक्सच्या ऑर्डर्स मिळतात आणि अशा केकसाठी आयत्यावेळी बॉक्स कुठून आणायचा तो प्रश्न पडतो. कधी कधी अशा उंच केकसाठी दुकानात बॉक्स मिळतात परंतु ते अत्यंत महाग असतात आणि तसे बघायला गेलात तर केकच्या बॉक्सचा कोणालाही काहीही उपयोग होत नाही. तो फेकूनच दिला जातो.
म्हणूनच आम्ही घेऊन आलोय एक सोपी पद्धत जी शिकून तुम्ही तुमच्या कितीही उंच केक रेगुलर बॉक्स वापरून पॅक करू शकाल