व्हीप क्रिम बनवा मिल्क पावडर पासून !

साहित्य

  • अर्धा कप मिल्क पावडर
  • अर्धा कप थंड पाणी
  • अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स
  • २ टेबलस्पून पीठी साखर
  • १ टेबलस्पून लिंबाचा रस

कृती

  • मिल्क पावडर मध्ये पाणी घालून ५ मिनिटं हाय स्पीडला बिटरने बिट करा
  • सॉफ्ट पीक दिसायला लागतील
  • आता व्हॅनिला इसेन्स घाला
  • पुन्हा ७ मिनटं हाय स्पीडला बिट करा
  • आता साखर व लिंबाचा रस घाला
  • शेवटी पुन्हा २ मिनिट हाय स्पीडला बिट करा 
  • तुमची व्हीप क्रिम तयार आहे

सूचना

  • बाजारात मिळणाऱ्या व्हीप टॉपिंग ह्या वनस्पती तेल, पाणी, इमल्सिफायर, ई. पासून बनवलेल्या असतात
  • अशा व्हिप टॉपिंग्सना बिट केल्यावर घट्ट क्रिम तयार होते
  • दुधापासून बनवलेली व्हिप क्रिम तितकीशी घट्ट नसते

अशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Reply