डोरा केक – मैदा, बेकिंग पावडर शिवाय !

साहित्य

  • १ कप गव्हाचे पीठ
  • अर्धा कप पिठी साखर
  • अर्धा टीस्पून बेकिंग सोडा
  • पाव चमचा मिल्क पावडर
  • १ टेबलस्पून मध
  • १ कप दूध
  • थोडे तेल
  • न्यूटेला चॉकलेट स्प्रेड 

कृती

  • गव्हाचे पीठ, पिठी साखर व बेकिंग सोडा एकत्र चाळून घ्या आणि छान मिक्स करून घ्या
  • वरील मिश्रणात मिल्क पावडर व मध घालून हळूहळू दूध घालून छान मिक्स करा
  • व्यवस्थित मिक्स करून स्मूथ बॅटर तयार करून घ्या
  • एक पॅन घेऊन तेलाने ब्रश करा आणि टिशू पेपरने सगळीकडे पसरवून घ्या
  • आता अर्धा कप बॅटर पॅनच्या बरोबर मध्ये ओता
  • लोणी स्पॉंज डोशाच्या आकाराएवढे बॅटर पसरेल
  • वरून पॅनचे झाकण लावा आणि मंद आचेवर ३ मिनिटं शिजवा
  • शिजलेला भाग तपकिरी रंगाचा होईल
  • आता पोळी उलटी करा आणि ३० सेकंद दुसरी बाजू शिजवा
  • हा भाग थोढा पिवळसर-पांढरट असेल
  • अशा साधारण केकच्या ४ पोळ्या तयार होतील
  • एका पोळीच्या पिवळसर-पांढरट भागावर चॉकलेट स्प्रेड (न्यूटेला) लावा
  • वरून दुसरी पोळी पालथी ठेवा
  • तुमचा अतिशय चविष्ट डोरा केक तयार झालाय

अशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Reply