व्हेज पफ / पॅटिस बनवा घरच्या घरी !

साहित्य

स्टफिंग साहित्य 
 • २ टीस्पून तेल
 • अर्धा टीस्पून जीरा
 • अर्धा कांदा बारीक किसलेला
 • १ हिरवी मिरची बारीक किसलेली
 • १ टीस्पून आले -लसणाची पेस्ट
 • थोडे मुळा, वाटाणा, बिट काप
 • अर्धा टीस्पून हळद
 • अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर
 • अर्धा टीस्पून गरम मसाला
 • अर्धा टीस्पून आमचूर
 • २ उकडलेले बटाटे
 • २ टेबलस्पून बारीक कापलेली कोथिंबीर
कणिक साहित्य
 • ३ कप मैदा + अर्धा कप मैदा 
 • चवीनुसार मीठ
 • २ टेबलस्पून बटर + ४०० ग्रॅम बटर
 • थंड पाणी
 • २ टीस्पून लिंबाचा रस

कृती

स्टफिंग
 • कढई गॅस वर ठेवून तेल, जीरा, किसलेला कांदा, आले -लसणाची पेस्ट घालून छान परतून घ्या
 • वरून मुळा, वाटाणा, बिट काप घाला आणि परत छान परतून घ्या
 • चवीनुसार मीठ घाला
 • कढईचे झाकण लावून १० मिनिटं शिजवा
 • आता हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, आमचूर घालून मंद आचेवर परतून घ्या
 • यात उकडलेले बटाटे स्मॅश करून घाला
 • छान मिक्स करा
 • आता बारीक कापलेलीकोथिंबीर घाला
 • आता तुमचे स्टफिंग तयार झाले
कणिक आणि पफ बनवणे
 • एका बाउल मध्ये ३ कप मैदा घेऊन त्यात मीठ आणि २ टेबलस्पून बटर घालून छान मिक्स करा
 • थंड पाणी घालून छान स्मूथ आणि सॉफ्ट कणिक मळून घ्या
 • बाउल मध्ये कणिक ठेवून वरून ओल्या फडक्याने झाका आणि १५ मिनिटं फ्रिज मध्ये ठेवा
 • दुसऱ्या बाउल मध्ये ४०० ग्रॅम बटर किसून घ्या
 • यात लिंबाचा रस घाला
 • चवीनुसार मीठ घाला
 • आता अर्धा कप मैदा घाला
 • छान मिक्स करून कणिक तयार करून घ्या आणि १५ मिनिटं फ्रिज मध्ये ठेवा
 • आता पहिले बाउल फ्रिजमधून बाहेर काढा आणि पुन्हा छान मळून घ्या
 • आता थोडी जाडसर पोळी लाटा
 • आता दुसरे बाउल बाहेर काढा आणि चौकोनी ठोकळा तयार करून वरील पोळीच्या मधोमध ठेवा
 • चारही बाजूने पोळी वरील चौकोनी ठोकळ्यावर फोल्ड करा
 • मस्त रॅप केलेला ठोकळा तयार होईल
 • बाउल मध्ये ठेवून वरून झाका आणि १५ मिनिटं फ्रिज मध्ये ठेवा
 • बाहेर काढून वरून मैदा भुरभुरवा
 • आता लाटून घ्या आणि परत फोल्ड करा आणि १५ मिनिटं फ्रिज मध्ये ठेवा असे ५-६ वेळा करा
 • आता फोल्ड केलेली पोळी बारीक लाटून घ्या
 • छोटे छोटे आयताकृती तुकडे तयार करा
 • प्रत्येक तुकडयांवर १ टेबलस्पून स्टफिंग घाला
 • करंजीसारखे अर्धे दुमडून पफचा आकार द्या आणि कडा बंद करा
 • एका ट्रे मध्ये सर्व पफ ठेवून वरून बटरने ब्रश करा
 • ओव्हन १४० डिग्रीला १० मिनिटं प्रीहीट करा
 • नंतर वरील ट्रे ओव्हन मध्ये ठेवून २५ मिनिटं बेक करा
 • तुमचे छान पफ/व्हेज पॅटिस तयार झालेत !

अशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Reply