केक बनवण्यासाठी बहुधा मैदा किंवा रेडिमेड प्रिमिक्स वापरले जातात. अनेकदा गृहिणींना केक घरच्या घरी आणि रव्यापासून करायचा असतो जेणेकरून तो झटपट घरगुती सामानापासून करता येईल आणि शिवाय आरोग्यासहि उत्तम असणार आहे. खाली दिलेली रेसिपी हि बहुतकरून दक्षिण भारतात प्रसिद्ध असून अगदी रवा, दही, दूध आणि साखरेपासून हा केक बनवता येतो. आजचा केक आपण कुकर आणि साध्या भांड्याच्या मदतीने करणार आहोत.
साहित्य
- अर्धा कप रवा
- अर्धा कप दही
- पाऊण कप दूध
- पाऊण कप साखर
- पाऊण कप वनस्पती तेल
- पाऊण टीस्पून बेकिंग सोडा
- अर्धा टीस्पून बेकिंग पावडर
- २ टीस्पून टुटी फ्रुटी
- मीठ चवीनुसार
- २ कप पाणी
कृती
- प्रथम पाणी कुकर मध्ये गरम करायला ठेवा
- रवा, दही, साखर, दूध, वनस्पती तेल आणि बेकिंग सोडा एकत्र करून मिश्रण तयार करून घ्या आणि २० मिनिटे ठेवून द्या
- नंतर वरील बॅटर मध्ये बेकिंग पावडर व थोडी टुटी फ्रुटी मिक्स करा
- भांडे ज्यात स्पॉंज बनवायचा आहे त्याला थोडे तेल लावून घ्या आणि वरील बॅटर ओता आणि एकसमान करून घ्या
वरून टुटी फ्रुटी पेरा - कुकर मधील पाण्याला एव्हाना उकळी फुटली असेल
- बॅटर चे भांडे कुकर मध्ये एका स्टॅन्ड वर ठेवा
कुकरच्या झाकणाची रिंग व शिटी काढून टाका आणि झाकण लावा - केक २० ते २५ मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या
- गॅस बंद करून कुकरचे झाकण हळूच उघडा आणि केक शिजलाय का नाही ते टूथपिक च्या मदतीने पाहून घ्या
- थंड झाल्यावर केक चाकूने कापून सर्व करा