You are currently viewing नाचोज बनवा घरीच, अगदी सोपी रेसिपी !

नाचोज बनवा घरीच, अगदी सोपी रेसिपी !

साहित्य

 • अर्धा कप मैदा
 • दीड कप कॉर्न आटा
 • अर्धा टीस्पून मिरपूड
 • १ टीस्पून तेल
 • फ्रायिंग साठी तेल
 • चिमूटभर हळद पावडर
 • चवीनुसार मीठ
 • थोडे पाणी

कृती

 • एका बाउल मध्ये कॉर्न आटा घ्या
 • यात मैदा, मिरपूड, हळद, तेल, मीठ घाला आणि छान मिक्स करून घ्या
 • थोडे थोडे पाणी घालून कणिक मळून घ्या
 • कणिक पातळ नको मध्यम मऊ कणिक बनवा
 • पाच मिनिट कणिक छान मळून घ्या
 • वरून झाकण ठेवून १० मिनिटं बाजूला ठेवा
 • नंतर छोटा गोळा घेऊन पोळीसारखं लाटून घ्या
 • लाटताना पीठ चिकटत असल्यास थोडा मैदा वापरू शकता
 • पोळी तयार झाल्यावर पिझ्झा कटर किंवा करंजी कापायच्या कटरने त्रिकोणी तुकडे करा
 • वरून फोर्कने सर्वीकडे टोचा म्हणजे तळतांना नाचोज फुलणार नाहीत
 • कढईत तेल घेऊन मध्यम गरम करा व गॅस मध्यम आचेवर ठेवा
 • वरील त्रिकोणी नाचोज तेलात तळा आणि पापडासारखे क्रिस्पी झाल्यावर बाहेर काढा आणि टिशू पेपरवर ठेवा
 • तुमचे छान नाचोज तयार झालेत
 • वरून चीज सॉस घालून सर्व्ह करा
 • फ्राय करायचे नसतील तर तुम्ही ओव्हन मध्ये बेक सुद्धा करू शकता

अशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Reply