एका बाउल मध्ये बटर घेऊन त्यात साखर घाला आणि बिटरने बिट करून घ्या
छान मलईदार होऊन सिल्की होईपर्यंत बिट करा
मैदा, बेकिंग पावडर,बेकिंग सोडा एकत्र करून चाळणीने गाळून घ्या आणि वरील सिल्की मिश्रणात घाला आणि कट आणि फोल्ड पद्धतीने मिक्स करून घ्या. खूप जास्त मिक्स करू नका
आता यात दही आणि दूध घालून परत कट आणि फोल्ड पद्धतीने मिक्स करून घ्या. गुठळ्या ठेवू नका. खूप जास्त मिक्स करू नका
आता मावा घेऊन त्याचा भुगा करून घ्या आणि वरील बॅटर मध्ये घालून कट आणि फोल्ड पद्धतीने मिक्स करून घ्या
शेवटी वेलदोडे पूड घाला आणि मिक्स करा
घट्ट बॅटर तयार होईल
केकच्या भांड्याला बटर किंवा तुपाने ग्रीस करा आणि वरून सगळीकडे मैदा भुरभुरवा
बॅटर केकच्या भांड्यात ओता आणि खाली आपटून घ्या म्हणजे बॅटर एकसारखे होईल आणि हवेच्या पोकळ्या निघून जातील
वरून ड्रायफ्रूट्सचे काप घालून सजवा
ओव्हन १० मिनटं १८० डिग्रीला प्रीहीट करा
प्रीहीट झाल्यावर आता केकचे भांडे ओव्हन मध्ये ठेवा
६० मिनिटं बेक करा ४० मिनिटानंतर टूथपिक घालून केक शिजलाय का ते बघून घ्या
शिजल्यावर केकचे भांडे बाहेर काढून घ्या
थंड करायला ठेवा
थंड झाल्यावर केकचे भांडे उलटे करून केक स्पॉंज बाहेर काढा
आता तुमचा छान मावा केक तयार झालाय !
टिप
तुम्हाला तयार मावा मिळत नसेल तर इन्स्टंट मावा करण्याची रेसिपी बघा खालील लिंक वर https://manveeraonline.com/how-to-make-instant-mawa-khava-from-milk-powder/
अशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Very nice recipe.