आंब्याचा पॅन केक

साहित्य

 • अर्धा कप हापूस आंब्याचा रस
 • १ कप गव्हाचे पीठ
 • १ कप दूध
 • १ कप  पाणी
 • ४ टेबलस्पून साखर
 • चवीनुसार मीठ
 • पाव टेबलस्पून बेकिंग पावडर
 • वनस्पती तूप

कृती

 • आंब्याचा रस, गव्हाचे पीठ, दूध, पाणी, साखर व मीठ एकत्र करून छान मिक्स करून घ्या
 • नंतर त्यात बेकिंग पावडर घाला आणि मिक्स करा
 • नॉन स्टिक तवा गरम करा
 • त्यावर तूप लावा व थोडे मिश्रण तव्यावर घालून जाडसर पसरवा
 • कडेने तूप घालून दोन्ही बाजूने भाजून घ्या
 • गरम गरम पॅन केक सर्व करा

अशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Reply