मँगो कँडी कशी बनवाल ?

साहित्य

  • १ कप आंब्याचे तुकडे
  • अर्धा कप पाणी
  • २ टेबलस्पून साखर
  • काळ्या द्राक्षाचे काप किंवा कुठल्याही आवडत्या फळाचे काप
  • पाऊण कप नारळाचे दूध

कृती

  • आंब्याचे तुकडे, पाणी व १ टेबलस्पून साखर मिक्सर मध्ये फिरवून घ्या आणि छान प्युरी करून घ्या
  • कुल्फी मोल्ड घेऊन त्यात वरील प्युरी अर्ध्याच्या वर ओता आणि मोल्डचे झाकण लावून घ्या
  • ३० मिनिटं फ्रिज मध्ये सेट करून घ्या
  • प्युरी थोडी घट्ट होईल
  • आता प्रत्येक मोल्ड मध्ये वरून थोडे थोडे द्राक्षाचे काप घाला 
  • परत ३० मिनटं फ्रिज मध्ये सेट करायला ठेवा
  • एका भांड्यात नारळाचे दूध घेऊन १ टेबलस्पून साखर घाला आणि विरघळवून घ्या
  • आता मोल्ड मध्ये उरलेल्या भागात नारळाचे दूध घालून मोल्डचे झाकण लावा
  • शेवटी ८ तास फ्रिज मध्ये सेट करायला ठेवा
  • बाहेर काढून मोल्ड कोमट पाण्यात बुडवून कँडी बाहेर काढा
  • आकर्षक कँडी बघून तुम्ही हरकून जाल !

अशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Reply