आंब्याचा केक स्पॉंज कसा बनवावा ?

सध्या आंब्याचा हंगाम आहे.आंबा वर्षातून एकदाच येणारे फळ. म्हणून आंब्यापासून विविध पदार्थ बनवण्याची हीच योग्य वेळ असते. चला तर मग बघूया आंब्याचा केक स्पॉंज कसा बनवायचा ते.

साहित्य

 • १ हापूस आंबा
 • १२० ग्रॅम मैदा
 • १२० ग्रॅम पिठी साखर
 • १ टेबलस्पून लोणी /अनसॉल्टेड बटर
 • ३-४ वेलदोडे पूड
 • ३-४ लवंगाची पूड
 • १ दालचिनी पूड
 • थोडे बेदाणे अर्धा चमचा
 • खायचा सोडा अर्धा
 • कप दूध

कृती

 • हापूस आंब्याचा रस काढून एकदा मिक्सर मधून फिरवून घ्यावा म्हणजे एकसारखा होईल
 • लोणी व पिठी साखर एकत्र फेटून घ्यावे
 • नंतर त्यात आंब्याचा रस घालावा आणि पुन्हा चांगले फेटून घ्यावे
 • यानंतर वेलदोडे, लवंग व दालचिनीची पूड घालावी
 • वरील मिश्रणात खायचा सोडा दुधात मिसळून घालावा
 • शेवटी त्यात हळूहळू मैदा घालून फेटून घ्यावे. हॅन्ड ब्लेंडरने किंवा मिक्सर मध्ये घुसळल्यास उत्तम वरील
 • मिश्रण केकच्या भांड्यात ओतावे (केकच्या भांड्याला आधी थोडे तूप लावून घ्यावे)
 • वरून बेदाणे घालून सजवावे
 • ओव्हन १० मिनटे प्रीहीट करून घ्यावे
 • शेवटी केकचे भांडे ओव्हन मध्ये ठेवून २५ मिनटे कॉन्व्हेक्शन मोड ला बेक करावे
 • तुमचा छान आंबा केक तयार झालाय

मस्त आस्वाद घ्यावा व हि रेसिपी इतरांनाही पाठवावी व आपला अभिप्राय अवश्य लिहावा

धन्यवाद

-हर्षाली

This Post Has 2 Comments

 1. Rohini Pawar

  Waah.. Thank you ma’am. So much informative.

 2. Shraddha khamparia

  Wow, Thanks for sharing the recipe..

Leave a Reply