गुळ आणि गव्हाच्या पिठाचा केक !

साहित्य

  • पाऊण कप गुळाचा किस किंवा गुळ पावडर
  • अर्धा कप कोमट दूध
  • ४ टेबलस्पून तूप
  • पाव कप बारीक रवा
  • १ कप गव्हाचे पीठ
  • १ टीस्पून बेकिंग पावडर
  • पाव टीस्पून बेकिंग सोडा
  • चिमूटभर मीठ
  • १ टीस्पून वेलदोडे पूड
  • ड्रायफ्रूट्स काप (ऐच्छिक)
  • टुटी फ्रुटी (ऐच्छिक)

कृती

  • एका बाउल मध्ये गुळ घेऊन त्यात दूध घाला
  • मिश्रण छान मिक्स करा आणि गुळ पूर्ण विरघळवून घ्या
  • मिश्रण ५ मिनिटं बाजूला ठेवून द्या
  • आता गुळ -दुधाच्या मिश्रणात साजूक तूप घाला आणि छान मिक्स करून घ्या
  • दुसऱ्या बाउल मध्ये रवा घ्या
  • यात वरून चाळणीने गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ एकत्र गाळून घ्या आणि छान मिक्स करा
  • आता गुळ -दुधाचे मिश्रण हळूहळू वरील पिठांत घालून छान बॅटर तयार करून घ्या
  • बॅटर घट्ट झाल्यास थोडे दूध घाला
  • आता वेलदोडे पूड आणि ड्रायफ्रूट्स काप घालून मिक्स करा
  • केकच्या भांड्याला आतून तुपाने ग्रीसिंग करून घ्या म्हणजे केक चिकटणार नाही
  • कुकर मध्ये स्टॅन्ड ठेवून १० मिनिटं गॅस वर कुकर झाकण लावून मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा (शिटी व रिंग नको)
  • बॅटर केकच्या भांड्यात ओता आणि खाली आपटून घ्या म्हणजे बॅटर एकसारखे होईल
  • वरून टुटी फ्रुटी पेरा
  • आता केकचे भांडे कुकरमध्ये ठेवा व झाकण लावा (शिटी व रिंग नको)
  • ३० ते ३५ मिनिटं बेक करा
  • ३० मिनिटानंतर टूथपिक किंवा चाकू घालून केक शिजलाय का ते बघून घ्या
  • शिजल्यावर केकचे भांडे बाहेर काढून घ्या
  • थंड करायला ठेवा
  • थंड झाल्यावर केकचे भांडे उलटे करून केक स्पॉंज बाहेर काढा
  • तुमच्या छान गुळ आणि गव्हाच्या पिठाचा केक स्पॉंज तयार झालाय !

अशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Reply