इन्स्टंट खवा बनवा मिल्क पावडर आणि बटर पासून !

साहित्य

  • पाव कप दूध
  • १ टीस्पून बटर
  • अर्धा कप दूध पावडर

कृती

  • एक पॅन (शक्यतो नॉन स्टिक) गॅसवर मंद आचेवर ठेवा
  • त्यात दूध आणि बटर घेऊन छान मिक्स करा
  • वरील मिश्रणात दूध पावडर घालून मिक्स करा आणि सर्व गुठळ्या काढून घ्या
  • छान गुळगुळीत मिश्रण झाले पाहिजे
  • मिश्रण घट्ट होईपर्यंत मिक्स करत रहा
  • नंतर घट्ट खव्यासारखे मिश्रण तयार होईल आणि पॅन पासून विलग होईल (पॅनला चिकटणार नाही)
  • आता आपला छान इन्स्टंट खवा तयार झालाय !

अशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Reply