You are currently viewing चोको लावा बॉम्ब बनवा सहज !

चोको लावा बॉम्ब बनवा सहज !

साहित्य

 • डार्क चॉकलेट
 • दूध
 • अर्धा कप मैदा
 • अर्धा कप पिठी साखर
 • पाव टीस्पून बेकिंग पावडर
 • चवीनुसार मीठ
 • २ टेबलस्पून कोको पावडर
 • १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स किंवा वेलदोडे पूड
 • २-३ टेबलस्पून बटर किंवा तूप

कृती

 • थोडे डार्क चॉकलेटचे तुकडे घेऊन त्यात गरम दूध घालून चॉकलेट मिक्स करून घ्या
 • क्रिम सारखी कन्सिस्टंसी आल्यावर थोडे सिरप बाजूला काढून बाकी फ्रिज मध्ये १५-२० मिनटं ठेवा
 • एका भांड्यात मैदा, पिठी साखर, बेकिंग पावडर,मीठ आणि कोको पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा
 • आता व्हॅनिला इसेन्स, वितळलेले बटर आणि बाजूला ठेवलेले चॉकलेट सिरप घाला
 • नंतर हळूहळू दूध घालून छान बॅटर तयार करा
 • बॅटर जास्त घट्ट न करता थोडे पातळसर घट्ट करा
 • अप्पे पात्र घेऊन आतून तुपाने ग्रीस करा आणि गॅस वर मंद आचेवर ठेवा
 • आता सर्व साच्यात बॅटर अर्ध्यापर्यंत घालून घ्या
 • आता फ्रिज मध्ये ठेवलेले चॉकलेट बाहेर काढून त्याचे छोटे छोटे भाग प्रत्येक साच्यात घाला
 • वरून चमच्याने चॉकलेट बॅटरमध्ये बुडवा. हवे असल्यास वरून पुन्हा बॅटर घाला
 • अप्पे पात्र वरून झाका
 • २-३ मिनिट मंद आचेवर शिजवा
 • आता गॅस बंद करून ३-४ मिनिट तसेच ठेवा
 • झाकण उघडून सर्व केक उलटे करा
 • झाकण लावून पुन्हा २-३ मिनिट शिजवा
 • आता तुमचे चोको लावा मिनी बॉम्ब तयार झालेत
 • कट केल्यावर आतून छान लावा बाहेर येईल
 • गरम गरम सर्व्ह करा

अशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Reply