ब्रेड चीज बॉल्स कसे बनवाल ?

साहित्य

  • २ उकडलेले बटाटे
  • १ बारीक चिरलेली हिरवी मिरची
  • १ टीस्पून किसून पेस्ट केलेले आले
  • २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
  • अर्धा टीस्पून मिरपूड
  • १ टीस्पून मिक्स्ड हर्ब
  • पाव टीस्पून जीरा पावडर
  • पाऊण टीस्पून मीठ
  • २ स्लाईस ब्रेड
  • २ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर
  • २ टेबलस्पून मैदा
  • पाव कप पाणी
  • चुरलेले कॉर्न फ्लेक्स

कृती

  • एका बाउल मध्ये उकडून स्मॅश केलेले बटाटे घ्या
  • त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, आले पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव टीस्पून मिरपूड, मिक्स्ड हर्ब, जीरा पावडर, अर्धा टीस्पून मीठ घाला
  • आता ब्रेडच्या कडा काढून घ्या आणि छोटे छोटे तुकडे करून वरील मिश्रणात घाला
  • आता सर्व मिश्रण छान मिक्स करून कणिक तयार करून घ्या
  • मस्त सॉफ्ट कणिक झाली पाहिजे
  • आता दुसऱ्या बाउल मध्ये कॉर्न फ्लोअर, मैदा, पाव टीस्पून मिरपूड, पाव टीस्पून मीठ आणि पाणी घालून छान मिक्स करा. गुठळ्या राहिला नकोत
  • आता कणकेचा भाग घेऊन छोटा गोळा करून दाबा
  • त्यावर चीजचा क्यूब ठेवून स्टफिंग करा आणि छान स्मूथ गोळा करा
  • आता चीजचा गोळा कॉर्न फ्लोअरच्या बॅटर मध्ये बुडवा
  • आणि नंतर चुरलेल्या कॉर्न फ्लेक्समध्ये घालून कोट करा
  • असे सर्व गोळे करून घ्या
बेकिंग
  • ओव्हन १८० डिग्रीला १० मिनटं प्रीहीट करा
  • एका अलुमिनियम ट्रे मध्ये चीज गोळे ठेवून ओव्हन मध्ये १५ मिनटं बेक करा
  • तुमचे छान चीज बॉल्स तयार झालेत !
किंवा
डीप फ्राय
  • कढईत तेल गरम करा
  • त्यात चीज बॉल्स डीप फ्राय करा
  • सोनेरी तपकिरी होईपर्यंत फ्राय करा
  • तुमचे छान चीज बॉल्स तयार झालेत !

Leave a Reply