आपण सर्वच हेल्थच्या बाबतीत सजग झालो आहेत. पूर्वीसारखे अंग मेहनतीचे काम जाऊन बैठे काम जास्त करावे लागत असल्याने पूर्वीसारखे तिखट, तेलकट आजकाल पचत नाही. दिवाळीच्या फराळात तळलेले पदार्थ खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यात शेव हा पदार्थ सगळीकडे असतो. आज आपण शेव तर करणार आहोत पण तीही बेक करून बनवलेली. नक्की करून बघा आणि आवडल्यास रेसिपी जरुर शेयर करा