होममेड चॉकलेट रेसिपी – फक्त ४ घरगुती वस्तूंपासून

साहित्य

  • अर्धा लिटर दूध  
  • साखर – १५० ग्रॅम
  • बटर – १५ ग्रॅम  
  • कोको पावडर – १२० ग्रॅम

कृती 

  • एक मोठी कढई घेऊन गॅसवर ठेवा आणि त्यात अर्धा लिटर दूध घाला
  • त्यात साखर घालून चमच्याने सतत ढवळा. नंतर बटर घालून पुन्हा ढवळा.
  • उकळून उकळून दूध अर्ध्यापेक्षा कमी झाले पाहिजे
  • पहिल्या उकळीनंतर तुम्ही फ्लेम कमी करू शकता
  • या रेसिपीसाठी तुम्हाला २० ते २५ मिनिटे लागतील
  • दूध पिवळसर आणि घट्ट झाल्यावर गॅस बंद करा आणि थंड करा
  • एका बाउल मध्ये वरील घट्ट दूध घ्या, त्यावर चाळणी ठेवून १०० ग्रॅम कोको पावडर चाळून घ्या   
  • आता छान मिक्स करून घ्या. मिक्स करताना मिश्रण डार्क आणि घट्ट होईल 
  • आता उरलेली २० ग्रॅम कोको पावडर पण चाळून घ्या आणि मिक्स करा
  • वरील मिश्रण मिक्स करायला हार्ड जाईल. घट्ट चॉकलेट बनेल
  • आता एका प्लेट वर प्लास्टिक घ्या (क्लिंग फिल्म किंवा प्लास्टिक रॅप) आणि वरील मिश्रणाचा गोळा त्यावर पसरवा
  • वरून पण प्लास्टिक रॅप करा आणि फ्रीजमध्ये एक तास ठेवा
  • एका प्लेट मध्ये कोको पावडर भुरभूरवा
  • चॉकलेट फ्रिज मधून काढून प्लेट वर ट्रान्सफर करा   
  • वरून पण कोको पावडर भुरभूरवा
  • तुमचे चॉकलेट तयार आहेत. छान कट करून राऊंड किंवा चौकोनी आकारात सजवा

वर दिलेल्या रेसिपीतील साहित्य तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. त्यासाठी लिंक्स खाली देत आहे 

As an Amazon Associate I earn from qualifying purchases

अशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Reply