साहित्य
- सव्वा कप मैदा
- पाऊण कप पिठी साखर किंवा आयसिंग शुगर
- अर्धा कप मिल्क पावडर
- दोन टेबलस्पून कॉर्नफ्लोवर
- एक टीस्पून व्हॅनिला पावडर
- एक टीस्पून बेकिंग पावडर
- अर्धा टीस्पून बेकिंग सोडा
- पाव टीस्पून सायट्रिक ऍसिड
कृती
- वरील सर्व घटक पदार्थ एकत्र करून मिक्सर मध्ये फिरवून घ्या
- वरील मिश्रण चाळणीने चाळून घ्या
- तुमचे व्हॅनिला प्रिमिक्स तयार आहे
- तयार झालेले प्रिमिक्स हवाबंद डब्यात ठेवा
- वरील प्रिमिक्स हवाबंद डब्यात ठेवल्यास तुम्ही ३ महिन्यापर्यंत वापरू शकतात
काही सूचना व माहिती
- प्रिमिक्स केकच्या रेसिपीत बटर, व्हिनेगर, दही, सोडा वॉटर, कंडेन्स्ड मिल्क नसते म्हणून कॉर्नफ्लोवर आणि सायट्रिक ऍसिड घालणे जरुरी असते
- बेकिंग पावडर, बेकिंग सोडा बरोबरच कॉर्नफ्लोवर आणि सायट्रिक ऍसिड यामुळे केक छान स्पॉंजी होतो
- बटर आणि कंडेन्स्ड मिल्क मुळे केकची किंमत वाढते
- बटर नसल्यामुळे प्रिमिक्सने केलेला केक १-२ दिवस ठेवला तरी सॉफ्ट राहतो
- बॅटर बनवून तयार झाल्यावर व्हिनेगरचा एक थेंब घाला आणि लगेच बेक करायला ठेवा. स्पॉंज छान फुगेल
- प्रमाण अर्धा किलोच्या केकसाठी: पाव किलो प्रिमिक्स, १३० ml पाणी आणि ५० ml तेल मिक्स करून बॅटर बनवा. केक टिनमध्ये घालून १७० डिग्रीला ४० मिनिटे बेक करा
- कुकरमध्ये बेक करणार असाल तर मंद ते मध्यम आचेवर साधारण ४० मिनिटे बेक करा
वर दिलेल्या रेसिपीतील साहित्य तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. त्यासाठी लिंक्स खाली देत आहे
Maida
Icing Sugar
Milk Powder / Dairy Whitener
Corn Flour
Vanilla Powder
Baking Powder
Baking Soda
Citric Acid
As an Amazon Associate I earn from qualifying purchases