साहित्य
- सव्वा कप मैदा
- पाऊण कप पिठी साखर किंवा आयसिंग शुगर
- अर्धा कप मिल्क पावडर
- पाव कप कोको पावडर
- एक टेबलस्पून कॉर्नफ्लोवर
- एक टीस्पून बेकिंग पावडर
- अर्धा टीस्पून बेकिंग सोडा
- पाव टीस्पून सायट्रिक ऍसिड
कृती
- वरील सर्व घटक पदार्थ एकत्र करून मिक्सर मध्ये फिरवून घ्या
- वरील मिश्रण चाळणीने चाळून घ्या
- तुमचे चॉकलेट प्रिमिक्स तयार आहे
- तयार झालेले प्रिमिक्स हवाबंद डब्यात ठेवा
- वरील प्रिमिक्स हवाबंद डब्यात ठेवल्यास तुम्ही ३ महिन्यापर्यंत वापरू शकतात
काही सूचना व माहिती
- प्रिमिक्स केकच्या रेसिपीत बटर, व्हिनेगर, दही, सोडा वॉटर, कंडेन्स्ड मिल्क नसते म्हणून कॉर्नफ्लोवर आणि सायट्रिक ऍसिड घालणे जरुरी असते
- बेकिंग पावडर, बेकिंग सोडा बरोबरच कॉर्नफ्लोवर आणि सायट्रिक ऍसिड यामुळे केक छान स्पॉंजी होतो
- बटर आणि कंडेन्स्ड मिल्क मुळे केकची किंमत वाढते
- बटर नसल्यामुळे प्रिमिक्सने केलेला केक १-२ दिवस ठेवला तरी सॉफ्ट राहतो
- बॅटर बनवून तयार झाल्यावर व्हिनेगरचा एक थेंब घाला आणि लगेच बेक करायला ठेवा. स्पॉंज छान फुगेल
- प्रमाण अर्धा किलोच्या केकसाठी: पाव किलो प्रिमिक्स, १३० ml पाणी आणि ६० ml तेल मिक्स करून बॅटर बनवा. केक टिनमध्ये घालून १८० डिग्रीला ३५ मिनिटे बेक करा
- कुकरमध्ये बेक करणार असाल तर मंद ते मध्यम आचेवर साधारण ४०-४५ मिनिटे बेक करा
वर दिलेल्या रेसिपीतील साहित्य तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. त्यासाठी लिंक्स खाली देत आहे
Pillsbury Chocolate Cake Premix
https://amzn.to/3l9Q34s
Maida
https://amzn.to/3zK811p
Icing Sugar
https://amzn.to/2WzeGNF
Milk Powder
https://amzn.to/3rH7haj
Cocoa Powder
https://amzn.to/2V1UEuz
Corn Flour
https://amzn.to/3j3IPfq
Baking Powder
https://amzn.to/3BWnkWq
Baking Soda
https://amzn.to/3BXaN5s
Citric Acid
https://amzn.to/3zMRAkL
As an Amazon Associate I earn from qualifying purchases