1. तुम्ही निवडलेली रेसिपी बरोबर पाहिजे
रेसिपी हि अस्सल पाहिजे. ज्याची रेसिपी तुम्ही संदर्भ म्हणून घेताय ती व्यक्ती अनुभवी पाहिजे. रेसिपी हि पूर्ण पाहिजे आणि तिच्यात कुठेही शंका उपस्थित होईल असा संदर्भ किंवा अर्धवट कृती नको. तसेच रेसिपी व्यवस्थित वाचावी आणि पूर्ण समजून घावी.
2. साहित्याची यादी करा आणि सर्व साहित्य जमवा
रेसिपी मध्ये दिलेले साहित्याची यादी करून सर्व साहित्य जमवा आणि मगच प्रत्यक्ष पदार्थ बनवायला घ्यावा. पदार्थ बनवतांना साहित्याची जमवाजमव करणे म्हणजे तुमचा पदार्थ पूर्णपणे बिघडून घेणे होय. तसेच कुठल्याही साहित्याला पर्यायी साहित्य घेऊ नये.
3. साहित्य मोजून घेणे
कृतीत दिलेले साहित्य सांगितल्याप्रमाणे बिनचूक मोजून घ्यावे. साहित्य मोजण्यासाठी वजन काटा किंवा साहित्य मोजण्याचे कप व स्पून चा सेट बाजारात मिळतो. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. अनेक जण इथेच चूक करतात. तुम्ही साहित्य अंदाजे घेतले तर तुमची रेसिपी हमखास चुकणार.
4. साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेणे
केक स्पॉंज बनवतांना ओले (wet) आणि सुके (dry) घटक (ingredient) असतात. ते व्यवस्थित मिक्स करून घेणे गरजेचे असते. मिक्स करण्यासाठी सिलिकॉन स्पॅचुला मिळतो. तसेच तुम्ही हॅन्ड ब्लेंडर/मिक्सर वापरू शकतात.
5. ओव्हन/कुकर आधीच गरम करून घेणे (Oven Preheating)
तुमचा ओव्हन/ कुकर बेकिंग पूर्वी एकसमान तापमानाला असणे गरजेचे असते. त्यायोगे तुमचा केक युनिफॉर्म बेक होईल. तुम्ही स्पॉन्जचे बॅटर बनवतांना ओव्हन/कुकर प्रीहिटिंग ला लावू शकतात.
6. प्रत्यक्ष केक बेकिंग करणे
स्पॉंजचे बॅटर बेकिंग साठी ठेवतांना ओव्हन च्या खालील गोष्टी नीट सेट करून मगच ओव्हन सुरु करावा
– ओव्हन चे तापमान सेट करावे
– बेकिंग चा वेळ सेट करावा
– ओव्हन चा मोड कन्वेक्शन मोड असावा कुकर मध्ये हे सर्व निर्देशानुसार एका फिक्स फ्लेम ला करावे.
7. ओव्हनचा दरवाजा उघडू नये
बेकिंगच्या वेळेआधी ओव्हन चा दरवाजा (कुकर असेल तर कुकरचे झाकण) उघडू नये. उत्सुकतेपोटी अनेक नवीन सुरवात केलेले बेकर्स हि चूक करतात. मध्ये मध्ये दरवाजा उघडल्याने आतील तापमान कमी जास्त होते आणि याचा थेट परिणाम केक स्पॉंजच्या बेकिंग वर होतो
8. बेकिंग झालेय का नाही ते बघा
ऋतूनुसार बेकिंग साठी लागणार वेळ कमी जास्त होऊ शकतो. रेसिपी मध्ये जरी एक वेळ दिलेला असेल तरी आपण स्पॉंज बेक झालाय का नाही ते बघणे आवश्यक असते. यासाठी लाकडी टूथपिक किंवा बाजारात लॉलीपॉप स्टिक मिळतात. हि स्टिक तुम्ही स्पॉंज मध्ये घालून बघावी. स्टिकला जर बॅटर नाही चिकटले तर स्पॉंज नीट बेक झालाय असे समजावे आणि बॅटर चिकटल्यास पुन्हा काही मिनिटांसाठी स्पॉंज बेकिंग साठी ठेवावा.