रेड वेलवेट केक म्हणजे फक्त रेड कलर घातलेला चॉकलेट केक नसून हा केक खूप सॉफ्ट असतो वेलवेट सारखा आणि चॉकलेटची टेस्ट खूप सौम्य असते. हा केक म्हणजे व्हॅनिला आणि चॉकलेट या दोघांच्यामधला केक असून सौम्य लोणी-ताकाची चव यात समाविष्ट केली जाते. यामुळे आम्लधर्मी गुण यात येऊन या केकची चव जरा हटके लागते. या संयोजनामुळे स्पॉन्जला गर्द मरून रंग येतो. स्पॉंज करताना चॉकलेट केकपेक्षा यात खूप कमी प्रमाणात कोको पावडर घातली जाते. आज हा केक आपण अगदी सोप्या रेनबो थीममध्ये करणार आहोत.
चला तर मग बघूया रेड वेलवेट रेनबो थीम केक कसा बनवायचा ते