साहित्य
- १ वाटी बारीक रवा
- पाव वाटी तूप
- १ वाटी ताक (आंबटसर)
- पाऊण वाटी जाड साखर
- अर्धा टीस्पून खायचा सोडा
- चिमूटभर मीठ
- अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स (नसल्यास वेलदोडे पूड)
- सजावटीसाठी पिस्ता काप
साहित्य
- तूप घेऊन छान फेटून घ्या व नंतर साखर घाला व पुन्हा मिक्स करा
- एक चमचाभर पाण्यात खायचा सोडा मिक्स करून वरील मिश्रणात घाला
- ताकात रवा, मीठ घालून वरील मिश्रणात पीठ सैलसर कालवा
- गरज वाटल्यास थोडे पाणी घाला
- आता तुमचे केकचे बॅटर तयार झाले
- केकच्या भांड्याला बटर किंवा तुपाने ग्रीस करा आणि वरून सगळीकडे मैदा भुरभुरवा
- बॅटर केकच्या भांड्यात ओता आणि खाली आपटून घ्या म्हणजे बॅटर एकसारखे होईल आणि हवेच्या पोकळ्या निघून जातील
- वरून पिस्ता काप घालून सजवा
- ओव्हन १० मिनटं १८० डिग्रीला प्रीहीट करा
- प्रीहीट झाल्यावर आता केकचे भांडे ओव्हन मध्ये ठेवा
- ३० ते ४० मिनिटं बेक करा ३० मिनिटानंतर टूथपिक घालून केक शिजलाय का ते बघून घ्याशिजल्यावर केकचे भांडे बाहेर काढून घ्या
- थंड करायला ठेवा
- थंड झाल्यावर केकचे भांडे उलटे करून केक स्पॉंज बाहेर काढा
- केक कापून सर्व करा
(हीच रेसिपी तुम्ही कुकरमध्येही करू शकता)