साहित्य
- सव्वा कप मैदा
- डेअरी मिल्क चॉकलेट (रुपये ३० ची)
- १ कप पिठी साखर
- पाव कप तेल /तूप
- अर्धा कप इन्स्टंट कॉफी
- पावडर १ पॅकेट
- रेगुलर इनो पावडर
- १ टीस्पून लिंबाचा रस
कृती
- मैदा आणि पिठी साखर घेऊन चाळणीने गाळून घ्या
- यात पाव कप तेल घाला
- उकळलेल्या पाण्यात कॉफी पावडर मिक्स करून वरील मिश्रणात घाला
- आता एका काचेच्या बाउल मध्ये डेअरी मिल्क चॉकलेट घालून ते काचेचे बाउल उकळत्या पाण्यात ठेवून डेअरी मिल्क पूर्णपणे वितळवून घ्या आणि वरील मिश्रणात घाला
- वरील बॅटर छान मिक्स करा गुठळ्या तयार व्हायला नकोत
- आता इनो आणि लिंबाचा रस घालून बॅटर पुन्हा छान मिक्स करा
- बॅटर केकच्या भांड्यात ओता आणि खाली आपटून घ्या म्हणजे बॅटर एकसारखे होईल आणि हवेच्या पोकळ्या निघून जातील
- ओव्हन १० मिनटं १८० डिग्रीला प्रीहीट करा
- प्रीहीट झाल्यावर आता केकचे भांडे ओव्हन मध्ये ठेवा
- ३०-३५ मिनिटं बेक करा ३० मिनिटानंतर टूथपिक घालून केक शिजलाय का ते बघून घ्या
- शिजल्यावर केकचे भांडे बाहेर काढून घ्या
- थंड करायला ठेवा
- थंड झाल्यावर केकचे भांडे उलटे करून केक स्पॉंज बाहेर काढा
- आता तुमचा छान घरगुती चॉकलेट केक तयार झालाय !