ओव्हन उघडू नये

बेकिंग करताना, स्पॉंज कसा भाजला जातोय हे पाहण्यासाठी ओव्हनमध्ये डोकावून पाहण्याचा मोह कदाचित आपल्याला आवरणार नाही. विशेषतः नवीन बेकर्स हि चूक हमखास करतात. तथापी, ओव्हनचा दरवाजा उघडल्यामुळे तापमानात अचानक घसरण होते ज्यामुळे आपल्या केकच्या बेकिंगवर गंभीर परिणाम होऊ शकतात. आपला स्पॉंज असमान बेक होईल आणि काही जागी जास्त भाजला जाईल तर काही ठिकाणी कच्चा राहील. 

पाककृतीमध्ये नमूद केलेल्या बेकिंगच्या वेळेचे किमान 3/4 वेळ संपेपर्यंत ओव्हनचा दरवाजा उघडू नये.

धन्यवाद 
-हर्षाली

Leave a Reply