बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा यात काय फरक आहे ?

बेकिंग पावडर
बेकिंग पावडर = ऍसिड (आम्ल धर्मी पदार्थ) + बेकिंग सोडा (अल्कली धर्मी पदार्थ)

बेकिंग पावडर ही बेक करायच्या पदार्थांना फुलवण्यासाठी वापरली जाते
बेकिंग पावडर मध्ये पाणी घातल्यावर कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो
हा वायू कणकेत किंवा बॅटर मध्ये हवेच्या पोकळ्या तयार करतो
ओव्हन मध्ये उच्च तापमानाला वायूचा दाब वाढून बॅटर/कणिक अजून फुलते

ऍसिड आणि अल्कली एकत्र आल्यावरच बबल्स तयार होऊ शकतात
बेकरी प्रॉडक्ट्स सच्छिद्र असतात ते ह्याच मुळे
म्हणून यात बेकिंग पावडर ची गरज असते

काही वेळा ऍसिडचे प्रमाण वाढवण्यासाठी अतिरिक्त बेकिंग सोडा पण वापरला जातो

Leave a Reply