एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ घेऊन त्यात मीठ, बेकिंग पावडर, वेलदोडे पूड व दालचिनी पूड घालून छान मिक्स करून घ्या
दुसऱ्या बाउल मध्ये गुळाची पावडर घेऊन त्यात तूप व दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या
आता वरील गूळ आणि तुपाचे मिश्रण पहिल्या बाउल मध्ये घालून मिश्रण छान फेटून घ्या. हे मिश्रण करताना मळू नका फक्त हाताने कालवून मिक्स करा आणि कणिक बनवा
आता कणिक झाकून १५ मिनिटे बाजूला ठेवा
पंधरा मिनिटानंतर कणिक लाटण्याने जाडसर लाटून घ्या
आता कूकीजचे विविध आकार कट करून घ्या. यासाठी विविध आकाराचे जसे गोल, हार्ट, क्लाऊड, स्टार अशा आकारात कुकी कटर बाजारात मिळतात. नसतील तर चाकूने आकार कट करा
प्रत्येक आकाराला काटेरी चमच्याने (फोर्क) छिद्रे करा
ओव्हन १० मिनिटे प्रीहीट करा
बेकिंग ट्रे वर बटर पेपर ठेवून सर्व कुकीज अरेंज करा आणि ओव्हन मध्ये १८० डिग्रीला २० मिनिटे बेक करा (बेकिंग ट्रे नसेल तर नॉन स्टिक पॅन किंवा अल्युमिनियमचे झाकण घेऊ शकता)
बेक झाल्यावर कूकीज थंड करा
वर दिलेल्या रेसिपीतील साहित्य तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. त्यासाठी लिंक्स खाली देत आहे