विविध प्रकारचे स्पेशल केक बनवायला शिका अगदी सोप्या मराठी भाषेतून. सहज मिळणाऱ्या आणि स्वस्त व उत्कृष्ट प्रतीच्या साहित्यातून बनवा मावा केक, लावा केक, प्लम केक, ब्राउनी व कपकेक. ह्या कोर्स मध्ये आपण शिकणार आहोत अतिशय चविष्ठ असा मावा केक बनवायला ज्यात माव्याबरोबर ड्रायफ्रुटस मिक्स घातले जातात. पुढचा केक आहे लोकप्रिय असा चॉकलेट लावा केक. केकच्या आतील लावा अतिशय सुंदर दिसतो आणि चॉकलेटची चव आणि केकचा स्पॉंज याची एकत्रित मजा काही औरच असते. ख्रिस्तमस काळात लोकप्रिय असणारा प्लम केक याची चव सर्वांहून न्यारी आणि थोडी मसालेदार अशी असते. ह्या केकचा एक वेगळा चाहता वर्ग असून नजीकच्या काळात याची मागणी वाढत आहे. ब्राउनी सर्वांनाच आवडते विशेषतः सिझलिंग ब्राउनी. हे सर्व केक प्रकार आणि शेवटी कपकेक सर्वात लोकप्रिय टी-टाईम मेनू, चला तर मग शिकूया असे विविध केक प्रकार ह्या कोर्स मध्ये.
- Estimated Time: 5 Days
- Categories: Beginner, Featured