You are currently viewing रव्यापासून बनवा कोकोनट जॅम केक / पेस्ट्री 

रव्यापासून बनवा कोकोनट जॅम केक / पेस्ट्री 

साहित्य

  • पाऊण कप बारीक रवा 
  • अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट 
  • पाऊण कप साखर (घरातली साखर, पीठी साखर नाही)  
  • अर्धा कप दूध (सामान्य तापमानाला)  
  • अर्धा कप दही (सामान्य तापमानाला)  
  • दोन टेबलस्पून देशी तूप 
  • अर्धा चमचा बेकिंग सोडा 
  • अर्धा चमचा बेकिंग पावडर 
  • अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स 
  • चहाचे पेपर ग्लासेस 
  • थोडे खाण्याचे तेल 
  • अर्धा कप मिक्स फ्रुट जॅम 
  • थोडे डेसिकेटेड कोकोनट रोलिंग साठी   
  • थोडे व्हीप क्रीम (ऐच्छिक)
  • चेरी (ऐच्छिक)

कृती 

  • साखर, दूध, तूप एकत्र घेऊन मिक्सर मधून फिरवून घ्या 
  • वरील मिश्रण भांड्यात घेऊन रवा, डेसिकेटेड कोकोनट, दही घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या 
  • व्हॅनिला इसेन्स घाला आणि पुन्हा मिक्स करा 
  • आता बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालून २ मिनिट छान मिक्स करून घ्या 
  • तुमचे केकचे बॅटर तयार झालेय 
  • चहाचे पेपर ग्लास घेऊन आतून तेलाचा ब्रश फिरवा  
  • त्यात केक बॅटर अर्ध्यापर्यंत भरा आणि थोडे जमिनीवर टॅप करा
  • असे सर्व ग्लास भरून घ्या  
  • ओव्हन १० मिनिट प्रीहीट करून घ्या 
  • आता बॅटर घातलेले सर्व ग्लास ओव्हन मध्ये ठेवा 
  • ओव्हनचे तापमान १६० डिग्री सेल्सिअस. बेकिंगचा वेळ १०-१२ मिनटं 
  • बेक झाल्यावर पेपर कप बाहेर काढून थंड करा 
  • आता सर्व केक डिमोल्ड करून घ्या 
  • कोकोनट मुळे केकचा वरील भाग थोडा तपकिरी होईल 
  • नाईफने वरील तपकिरी भाग काढून घ्या 
  • जॅम मध्ये थोडे पाणी घाला आणि जॅम पातळ करून घ्या. यात थोडा पिंक कलर घालून डार्क करू शकता
  • आता केकचा सर्व बाजूने जॅम लावून घ्या 
  • जॅम लावलेले केक डेसिकेटेड कोकोनट मध्ये रोल करून घ्या म्हणजे त्यावर कोकोनटचे छान लेयेरींग होईल 
  • अधिकचे डेसिकेटेड कोकोनट डस्ट करून घ्या 
  • आता व्हीप क्रीमने केकवर एक गोल तयार करून मध्ये चेरी ठेवा. याने तुमची कोकोनट जॅम केक खूप सुंदर दिसेल 
  • अशा पद्धतीने तुमची कोकोनट जॅम पेस्ट्री तयार झालीये

As an Amazon Associate I earn from qualifying purchases

अशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Reply