स्विस रोल, जेली रोल, रोल केक, क्रिम केक रोल, रुलाड किंवा स्विस लॉग हा रोल्ड केक स्पॉंजचा एक प्रकार आहे ज्यात व्हिप्ड क्रिम, बटरक्रीम, फ्रुट जॅम, चॉकलेट गनाश किंवा फज भोवती व्हॅनिला केक स्पॉंजचा बारीक लेयर रोल केलेला असतो. हि अगदी सोपी रेसिपी आहे परंतु याची टेस्ट अतिशय छान लागते. आज आपण चॉकलेट केक स्पॉंज व्हीप्प्ड क्रीम फिलिंगचा वापर करून रोल करूयात.