चोको केक बनवा चॉकलेट बिस्किट्स पासून तेही इडली पात्रात !

साहित्य

  • १४ बॉरबोन बिस्किट्स
  • अर्धा कप दूध
  • ३ टेबलस्पून साखर
  • ३ टेबलस्पून तेल
  • पाव टीस्पून बेकिंग सोडा

कृती

  • बिस्किटाचे तुकडे करून मिक्सर मध्ये ग्राइंड करून घ्या
  • यात साखर घालून पुन्हा मिक्सर मधून फिरवून घ्या
  • एका बाउल मध्ये वरील पावडर घेऊन दूध आणि तेल घाला आणि छान मिक्स करून घ्या
  • छान बॅटर तयार झाले पाहिजे
  • यात बेकिंग सोडा घालून मिक्स करून घ्या
  • इडली पात्राला आतून तेलाने ब्रश करून घ्या म्हणजे केक चिकटणार नाही
  • इडली च्या भांड्यात तळाला थोडे पाणी घालून झाकण ठेवून ५ मिनिटं प्रीहीट करा
  • नंतर बॅटर इडली साच्यात ओतून साचे इडलीच्या भांड्यात ठेवा आणि झाकण लावा
  • मंद आचेवर १५ ते २० मिनिटं शिजवा (बेकिंगचा वेळ कमी जास्त असू शकतो)
  • साचे बाहेर काढून थंड करा
  • केक बाहेर काढा
  • आता तुमचे इडलीच्या आकाराचे छान चोको केक रेडी झालेत !

अशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Reply