- बिस्किट्स मिक्सर मध्ये फिरवून छान पावडर करून घ्या
- यात पिठी साखर घालून मिक्स करून घ्या
- आता दूध घाला
- नंतर २ टीस्पून पाण्यात अर्धा टीस्पून कॉफी घालून गरम करून घ्या आणि वरील मिश्रणात घाला
- व्हॅनिला इसेन्स घालून सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्या
- आता इनो घालून छान मिक्स करून घ्या
-
केकच्या भांड्याला बटर किंवा तुपाने ग्रीस करा आणि वरून सगळीकडे मैदा भुरभुरवा
बॅटर केकच्या भांड्यात ओता आणि खाली आपटून घ्या म्हणजे बॅटर एकसारखे होईल आणि हवेच्या पोकळ्या निघून जातील
वरून अक्रोडचे काप किंवा चोको चिप्स घालून सजवा
१० मिनिटं गॅस वर कुकर प्रीहीट करण्यासाठी ठेवा (शिटी व रिंग नको)
आता केकचे भांडे कुकरमध्ये ठेवा व झाकण लावा (शिटी व रिंग नको) २५ ते ३० मिनिटं बेक करा २५
मिनिटानंतर टूथपिक घालून केक शिजलाय का ते बघून घ्या
शिजल्यावर केकचे भांडे बाहेर काढून घ्या
थंड करायला ठेवा
थंड झाल्यावर केकचे भांडे उलटे करून केक स्पॉंज बाहेर काढा
केक स्पॉंज वर तुम्ही चॉकलेट मेल्ट करून घालू शकता
तुमचा छान चॉकलेट केक तयार आहे !