केकच्या आकर्षक डिझाईन्स बनतात केवळ केक नोझल्स मुळे. आयसिंग बॅग मध्ये हवे त्या डिजाईनचे नोझल बसवून व्हिप केलेली क्रीम घातली जाते आणि विविध डिझाईन्स केल्या जातात. क्रीमच्या डिझाईन्स नोझल्स शिवाय अशक्य! बाजारात विविध प्रकारचे नोझल्स उपलब्ध असतात. अक्षरशः शेकडो डिझाईन्स आहेत. शक्यतो स्टील नोझल्स घ्यावेत. प्लास्टिकचे नोझल्स जास्त टिकत नाहीत. खूप पर्याय असल्यामुळे होम बेकर्सचा खूप गोंधळ उडतो. नव्याने बेकिंगची सुरुवात करणाऱ्यांना तर काय करावे कुठले नोझल्स घ्यावेत काही काळत नसते. म्हणूनच आम्ही घेऊन आलोय हा खास व्हिडीओ – केक डेकोरेशनचे नोझल्स आणि त्यांचा वापर