केक सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी तुमची व्हीप क्रीम छान बिट होणे गरजेचे असते. केकची फिनिशिंग तसेच केकवरची वेगवेगळी डिझाईन व्हिप क्रीमचा वापर करून केली जाते. व्हिपिंग क्रीम बिट करण्यासाठी एक चांगल्या बिटर किंवा हॅन्ड ब्लेंडरची गरज असते. बाजारात विविध प्रकारचे, विविध पॉवर आणि कंपन्यांचे बिटर किंवा हॅन्ड ब्लेंडर उपलब्ध असतात. किमतीही साधारण ५०० रुपयापासून काही हजारांपर्यंत पाहायला मिळतात.
बऱ्याचदा एवढे सारे मॉडेल्स बघून गोंधळायला होते आणि मी माझ्या गरजेसाठी नक्की कोणता बिटर किंवा हॅन्ड ब्लेंडर घेऊन याचा निर्णय घेणे अवघड जाते आणि तसेच घेतल्यानंतर असेही होते कि याच्यापेक्षा चांगला अथवा याच्यापेक्षा स्वस्त चालला असता असेही वाटते. तुमच्या अशा सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत हा खास व्हिडिओ.