सध्या बेन्टो केक किंवा लंचबॉक्स केक ट्रेंडिंग मध्ये आहे. याचे वैशिष्ट म्हणजे हा केक छोटा २ जणांना पुरेल असा असतो आणि लंच बॉक्स सारख्या केकच्या बॉक्स मध्ये तो आरामात फिट होतो. लंच बॉक्स मध्ये ठेवता येण्यासारखा असल्याने हा केक पिशवीत, बॅगेत अथवा पर्स मध्ये सहज नेता येतो आणि ट्रॅव्हल करत असतांनाही तुम्ही केक खाण्याचा आनंद घेऊ शकतात.