बेकिंग पावडर ऐवजी कुठल्या घरगुती वस्तू वापराल ?

दही + खाण्याचा सोडा

  • अर्धा कप प्लेन आंबट दही घ्या व वेट इन्ग्रेडियंट मध्ये शेवटी मिक्स करा
  • पाव टीस्पून खाण्याचा सोडा घ्या व ड्राय इन्ग्रेडियंट मध्ये शेवटी मिक्स करा
  • वरील मिश्रण १ टीस्पून बेकिंग पावडर ऐवजी वापरा
  • दही घातल्यामुळे तुम्हाला जे वेट इन्ग्रेडियंट घ्यायचे आहेत ते दह्याच्या प्रमाणात कमी घ्या म्हणजे बॅटर पातळ होणार नाही

ताक + खाण्याचा सोडा

  • अर्धा कप आंबट घट्ट ताक घ्या व वेट इन्ग्रेडियंट मध्ये शेवटी मिक्स करा
  • पाव टीस्पून खाण्याचा सोडा घ्या व ड्राय इन्ग्रेडियंट मध्ये शेवटी मिक्स करा
  • वरील मिश्रण १ टीस्पून बेकिंग पावडर ऐवजी वापरा
  • ताक घातल्यामुळे तुम्हाला जे वेट इन्ग्रेडियंट घ्यायचे आहेत ते ताकाच्या प्रमाणात कमी घ्या म्हणजे बॅटर पातळ होणार नाही

लिंबू + खाण्याचा सोडा

  • अर्धा टीस्पून लिंबाचा रस घ्या व वेट इन्ग्रेडियंट मध्ये शेवटी मिक्स करा
  • पाव टीस्पून खाण्याचा सोडा घ्या व ड्राय इन्ग्रेडियंट मध्ये शेवटी मिक्स करा 
  • वरील वस्तू १ टीस्पून बेकिंग पावडर ऐवजी वापरा

व्हाईट व्हिनेगर + खाण्याचा सोडा

  • अर्धा टीस्पून व्हाईट व्हिनेगर घ्या व वेट इन्ग्रेडियंट मध्ये शेवटी मिक्स करा
  • पाव टीस्पून खाण्याचा सोडा घ्या व ड्राय इन्ग्रेडियंट मध्ये शेवटी मिक्स करा 
  • वरील वस्तू १ टीस्पून बेकिंग पावडर ऐवजी वापरा

सूचना

  • बेकिंग पावडर डबल ऍक्टिंग असते म्हणजे तिचे दोनदा परिणाम मिळतात. जेंव्हा आपण बेकिंग पावडर बॅटर मध्ये मिक्स करतो तेंव्हा बॅटर बेकिंग पावडर मुळे फुलते तसेच दुसऱ्यांदा जेंव्हा बॅटर टिन मध्ये घालून बेक होत असते त्यावेळी पुन्हा एकदा बेकिंग पावडर चा परिणाम जाणवतो
  • वरील पर्याय तसे काम करत नाहीत म्हणून बॅटर बनवल्यावर त्वरित बेक करावे जेणेकरून चांगला परिणाम मिळेल

अशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Reply